चौसाळा येथील बौध्द विहारास व दलित वस्तीस निधी उपलब्ध करून देण्यात दलीत पँथरची खासदार प्रितमताई मुंडे यांच्याकडे मागणी

35

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.22मे):-दलित युथ पँथर चे मराठवाडा राज्य सचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष पवन कुचेकर यांनी बीड जिल्हयाच्या लोकप्रिय खासदार प्रितमताई मुंडे यशश्री निवास्थानी भेट घेवुन बीड तालुक्यातील चौसाळा सर्कल मधील विविध विषयावर चर्चा करून चौसाळा येथील दलित वस्तीला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली तसेच चौसाळा येथील भीम नगर , शाहू नगर याठिकाणी बौध्द विहारासाठी निधी देण्याची मागणी करताच आदरणीय प्रितमताई मुंडे यांनी लवकरच चौसाळा याठिकाणी खासदार फंडातुन बौध्द विहारासाठी निधी देण्यात येईल असा शब्द दिला.

तसेच ताई साहेबांसमोर गेल्या गेल्या ताई साहेबांनी आवर्जून विचारले काय पवन कसा आहेस ?? एवढ्या मोठ्या नेत्याने आवर्जून नाव लक्षात ठेवून विचारपूस करणे हे फक्त ताईसाहेबच करू शकतात असे बोलताना दलित युथ पँथर चे मराठवाडा राज्य सचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष पवन कुचेकर यांनी सांगितले.