चकबोथली येथील ऍसिड हल्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.23मे):-सण 2017 मध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा चकबोधली ऍसिड हल्यातील आरोपीला सत्र न्यायालयाने दि. 21/05/2022 रोजी जन्मठेपेची शिक्षा देवुन 30,000/- आर्थिक दंड दिलेला आहे.

दिनांक 29/11/2017 रोजी मौजा चकबोथली येथील आरोपी नामे अमोल किसन उर्फ कृष्णराव चौधरी, वय 22 वर्ष याने फिर्यादी हिला शारीरीक सुखाची मागणी केली असता फिर्यादीने नकार दिला. परत पुन्हा आरोपीने मित्राचे मोबाईल वरुन फोन करुन शारीरीक सुख न दिल्यास मारण्याची धमकी दिली होती. सदर तारखेला फिर्यादी हि आपल्या मुलांसोबत रात्रौ घरात झोपली असतांना आरोपीने घरात प्रवेश करुन फिर्यादी व तिच्या मुलाचे अंगावर ज्वलनशिल पदार्थ (ऍसिड) टाकुन जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमीचे बयाण व मेडीकल रिपोर्ट वरुन पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे 1134/2017 कलम 307,326 (अ), 450 भादंवि सहकलम 3 (1), 12 अनु. जा.ज कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले. सदर गुन्ह्यातील आरोपी अमोल चौधरी यास अटक करण्यात आली. सदर प्रकरणात संपरीक्षेअंती मा. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस ऍसिड हल्याच्या गुन्हयात दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा देवुन 30,000 /- रु आर्थिक दंड दिलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री प्रशांत परदेशी साहेब यांनी केलेला असुन सध्याचे कोर्ट पैरवी अधिकारी पो हवा रामदास कोरे ब.न. 414 पो.स्टे. ब्रम्हपुरी यांनी दोषसिध्दीसाठी मोलाचे सहयोग केलेले आहे.