सामाजिक कार्याची आवड असलेल्या डॉ. मीनलताई खतगावकर यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल -मा.आमदार वसंतराव चव्हाण

37

✒️विषेश प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी मिळविल्यानंतर अर्थार्जन न करता तळागाळातील गोरगरीब जनतेच्या सेवेकरिता अहोरात्र परिश्रम करणाऱ्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी प्रतिपादन केले. ते शंकरनगर येथील गोदावरी मनार चारीटेबल ट्रस्टच्या प्रांगणात डॉ. सौ. मीनलताई पा. खतगावकर यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार तथा संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पा.खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आदी मान्यवर उपस्थित होते.

दि. 23 मे रोजी गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट व साई शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने डॉ. मीनलताई पा. खतगावकर यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयाचे शंकरनगर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वसंतराव चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी स्व. शंकररावजी चव्हाण व स्व. मधुकरराव पा. खतगावकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. पिंपळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर आनंदराव बिराजदार अॅड. प्रीतम देशमुख, प्रा. शिवाजी पा. पाचपिपळीकर यांनी विचार मांडले. याप्रसंगी बोलताना माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा म्हणाले की, डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांना खूप मोठा राजकीय वारसा लाभला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आणि माजी खासदार भास्करराव पा. खतगावकर यांच्या मार्गदर्शनामुळे त्या येत्या काळात राजकारणातील मोठ्या पदापर्यंत पोहोचतील यात शंकाच नाही. याप्रसंगी बोलताना माजी खासदार भास्करराव पा. खतगावकर म्हणाले की, केवळ राजकीय वारसा असून चालत नसतो तर तळागाळातील समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आंतरिक तळमळ व कठोर परिश्रमाची गरज असते. राजकारण करणे सोपे नाही. राजकारण करायचे असेल तर गावातील लोकांच्या समस्यांची जाणीव असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना जीव लावण्याची देखील गरज आहे. जे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळतात त्यांना राजकारण करणे सोपे जाते. अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना डॉ. मीनलताई पा. खतगावकर म्हणाल्या की, मला माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण हे राजकीय गुरू लाभले असून त्यांच्या आशीर्वादाने आणि माझे सासरे खतगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी बिलोली तालुक्यातील निराधार महिला, दलित वंचित वर्ग त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्नशील राहून सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

डॉ. मीनलताई पा. खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी माजी उपमहापौर सरजितसिंघ गिल, बाळासाहेब पा. खतगावकर,माजी नगराध्यक्ष सौ. मैथिली कुलकर्णी,मोगलांनी शिरशेटवार, दीपक पावडे, रवी पा. खतगावकर, माधव कंधारे, गिरीधर पा. डाकोरे, मंगल देशमुख, मारोती पटाईत, नागोराव पा. रोषणगावकर, हनुमंतराव पा. बामणीकर, अनुप अंकुश कर, डॉ.कासराळीकर, प्रताप पा. जिगळेकर, निवृत्ती कांबळे, दिलीप पांढरे, महेश हांडे, राजेंद्र मंडगीकर, नागनाथ आनंतवाड, अंबादास शिंगारे, अजमत चाऊस, चंद्रकांत देवारे, जनार्दन बिरादार, हाजप्पा पा, परशुराम पा. शिवूरकर,माधव वाघमारे, धोंडीबा कांबळे, गजानन पा. मुजळगेकर,अॅड.रानवळकर, प्रकाश पाटील बडुरकर, संतोष पुयड, प्राचार्य शंकर राठोड, आशाताई महाजन, हणमंत तोडे, सदाशिव पा, मुरलीधर देगलूरे, हणमंत वाडेकर,सौ.मनिषा तोडे,सौ.जयश्री देगलूरे, पत्रकार सय्यद नविद अंजुम निळकंठ जाधव. हनुमंत चंदनकर. शेषराव कंधारे. तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पा, चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, मंडळ अधिकारी विजय पा. जाधव सुधाकर पा. जाधव मोकासदरेकर रणजीत पा. मोरे देगाव शुभचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्यंकटेश चौधरी यांनी केले. आभार धनंजय शेळके यांनी मानले.