आदिवासींच्या शिवणी वस्त्यावर लागलेल्या आगीत जनावरे गंभीर जखमी..!

33

🔸आग विझवतांना १७ वर्षांचा भारत निंगवाल जखमी..!

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

संग्रामपूर(दि.23मे):-तालुक्यातील शिवणी येथिल (दयालनगर ३५ नंबर) मधे निंगवाल परीवार वास्तव्यास असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या वाड्यावरिल गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. २२ मे रोजी दुपारी २ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्या आगीत तेथे वास्तव्यास असलेले जामसिंग गोमा निंगवाल, मोहन निंगवाल, वालसींग निंगवाल,आणी भारत निंगवाल यांच्या राहत्या घरा लगत असलेल्या गोठ्यातील शेती उपयोगी सर्व साहित्य जळुन खाक झाले, तसेच गोठ्यातील २ म्हैसी,१ बैल,१ गाय, १ बकरी ही जनावरे जास्त प्रमाणात भाजल्या गेले, या जनावरांना वाचवण्यासाठी व लगत असलेले राहत्या घराचा बचाव करण्यासाठी वय वर्षे १७ असलेल्या भारतने अडीच तास आग विझवण्यासाठी सतत झुंज दिली, त्यातुन जनावरे गंभीर जखमी झाले असले तरी त्यांना बाहेर काढले.

पंरतु भारतला मात्र आग विझवतांना झालेल्या ईजा सोसत शरीरावर बऱ्याच ठिकाणी चटके खावे लागले. येवढा गंभीर प्रकार असुनही प्रशासनाने मात्र या आदिवासी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची खंत आहे. महसूल विभागातील दारुड्या तलाठी यांनी बेजबाबदार पणे केलेला पंचनामा हा आदिवासी शेतकऱ्यांना मारक ठरणारा असुन. तहसीलदार यांनी याकडे विशेष लक्ष देउन जिल्हाधिकारी यांचे कडे सत्य माहिती द्यावी. असे महसूल विभागाला आम्ही कळविले असुन दिरंगाई झाल्यास होणाऱ्या परीणामास प्रशासन जबाबदार असेल असे ठणकावून सांगितले.