“ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तुत्वाने लोकाभीमुख राजा बनू शकतो”

81

▪️लोकमाता महाराणी अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त विशेष लेख

आधुनिक भारताच्या इतिहासात महाराणी लोकमाता अहिल्यामाई होळकर यांचे स्थान सर्वात उंच आहे.त्यांचा जन्म 31मे 1725 ला सीना नदीच्या काठावर असणाऱ्या चौंडी ता.जामखेड जि. अहमदनगर येथे झाला.त्यांचे वडील माणकोजी शिंदे तर आई सुशीला होती. लोकमाता अहिल्यामाई यांना पाच भाऊ होते.त्या बालपणा पासूनच बुद्धीने तल्लख,चतुर होत्या.एक प्रसंग आहे,बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर हे चौंडी शिवारातून जात असताना पाणी पिण्यासाठी थांबतात त्यावेळी शेतात बाल लोकमाता अहिल्यामाईची भेट होते आणि संवाद साधताना म्हणते
*तहानलेल्या पाणी पाजण्या अगोदर दोन घास जेवू घालणे हा आमचा धर्म आहे* !”

सुभेदार मल्हारराव होळकर प्रभावित होऊन पुढे आपला मुलगा खंडेराव आणि लोकमाता अहिल्यामाई यांचा 20 मे 1733 ला पुणे येथे विवाह लावतात.खंडेराव ही शूरवीर होते,त्यांना ही ‘शिलेदार’ ही पदवी बहाल केली होती.जयपूर युद्ध,जाटांचे बंड मोडणे,दिल्ली बादशहा भेटीस ही जात .17 मार्च 1754 ला कुंभेरी च्या युद्धात गोळी लागून त्यांना वीरमरण आले.यामुळे सुभेदार मल्हारराव होळकर प्रचंड दुःखात होते,

त्यावेळी लोकमाता अहिल्यामाई दुःख सावरून कुटुंबातील सर्वांना धीर देतात,”मामाजी दुःख आवरा,मी सती जाणार नाही”.ही एक क्रांतीकारक घटना आहे.ज्याचा वारसा माँसाहेब जिजाऊ नंतर लोकमाता अहिल्यामाई पुढे अंगिकरला.लोकमाता अहिल्यामाई यांना राजनैतिक शिक्षण हे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दिले.लोकमाता अहिल्यामाई यांना ही वाचनाची आवड होती.महेश्वर येथे एक ग्रंथालय उभारणी केली. अनेक महत्वाचे ग्रंथ, दुर्मीळ ग्रंथ, साहित्य त्यांनी ग्रंथालयात उपलब्ध केले होते.त्याचबरोबर त्या नियमितपणे रोजनिशी लिहीत असत.सासरे सुभेदार मल्हारराव अत्यंत शूरवीर होते.26 मे 1728 ला इंदौर ला स्वतंत्र राज्यकारभार सुरुवात करून होळकरशाहीची सुरुवात केली. बाजीराव पेशवे यांच्या कडून 3 लक्ष रुपयांची खासगी जहागिरी मिळविली.”मल्हार आया भागो “

इतकी भीती त्यांनी शत्रू सैन्यात निर्माण केली होती.’अटक ‘येथील विजय,1757 ला नजीबखान चा पराभव केला,त्याला जीवदान दिले.1766 ला मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला. यानंतर लोकमाता अहिल्यामाईने मुलगा मालेराव यांस 3 जून 1766 ला गादीवर बसवून राज्यकारभार चालू ठेवला.आणि 27 मार्च 1767 ला 22वर्ष वय असणाऱ्या मालेराव यांना वीरमरण आले.पती खंडेराव 1754,सासू गौतमाबाई 1761,सासरे मल्हारराव 1766 व मुलगा मालेराव 1767 यांच्या मृत्यूने दुःखाचा डोंगर लोकमाता अहिल्यामाईवर कोसळला.अशा प्रसंगी साथसंगत अपेक्षित असतांना ,मालेराव यांच्या मृत्यूनंतर पेशवा राघोबा आणि दिवाण गंगाधरपंत चंद्रचूड यांनी राज्य स्वतः च्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला.पंतांनी आपला मुलगा गादीवर बसविण्यासाठी कट ,कारस्थान, चालू केले. लोकमाता अहिल्यामाई होळकर यांनी नकार देताच युद्धाची तयारी केली. राघोबा पेशवा आणि पंत यांनी 50 हजार सैन्यासह चढाईची तयारी केली.

लोकमाता अहिल्यामाई यांनी स्वतः कारभार हाती घेऊन पत्रव्यवहार करून शिंदे,भोसले,गायकवाड, दाभाडे या सरदार मंडळींची मदत घेतली. महिलांची स्वतंत्र तुकडी सज्ज केली आणि सेनापती शरीफभाई नेतृत्व करत होते.लोकमाता अहिल्यामाई होळकर यांनी पेशवा राघोबा यास खलिता पाठविला,
*”माझ्या पूर्वजांनी मिळविलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल परंतु देशद्रोही पेशव्यांचे कपट कारस्थान चालू देणार नाही.हे राज्य माझ्या पूर्वजांनी तलवारीच्या बळावर रक्ताचे पाणी करून जिंकले आहे,भाट-भडवेगिरी करून नव्हे*!”

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी याचप्रकारे 12 लढाया हाती तलवार घेऊन जिंकल्या यात 1771,1783 आणि 1787 चंद्रवताचे आक्रमणे परतवून लावली आहेत.त्या शूरवीर होत्याच त्याच बरोबर राज्यकर्ती म्हणून अनेक उत्कृष्ट गुण त्यांच्याकडे होते.कडक शिस्त होती.यात हयगय सहन करत नसत.नाना फडणवीस यांनी हिशोबात घोळ केला त्यावेळी त्यास ताकीद देताच त्यांनी माफी मागितली आणि पुन्हा चूक होणार नाही आणि घोळ रक्कम भरपाई केली. सिरोज परगणा वारस दत्तक प्रकरणात तुकोजी होळकर यांनी ‘लाच’ घेतली,ही बाब माहिती झाल्यावर त्यास कठोर शब्दांत सुनावणी करून पैसे परत करण्यास सांगितले. महिपतपुर येथील मामलेदाराने प्रजेकडून ज्यादा दराने वसुली केली,ही बाब माहिती झाली की ज्यादा वसुली परत करण्यास सांगितले आणि सक्त ताकीद.या घटनांतून रयतेची काळजी सतत जाणवते.आजही आम्हाला होळकरांच्या राजवाड्यावर संदेश दिसतो,
*प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते*.

*रयत काळजीचा एक प्रसंग*
“त्यांनी जो वीर माझ्या राज्यातील चोर,डाकू,लुटेरे यांचा बंदोबस्त करून राज्यात शांतता निर्माण करील त्यास माझी एकुलती एक मुलगी ‘मुक्ता ‘सोबत लग्न लावून देईल” आणि ही जबाबदारी एका तरुणाने पार पाडली जो ‘यशवंत फणसे’ हा शूरवीर होता.यातून एक नाते जोडले गेले.
याचप्रकारे पुढे राज्यातील लोकमाता अहिल्यामाई होळकर यांनी अनेक गुन्हेगार जमाती चा शिक्का असणाऱ्या लोकांचे मतपरिवर्तन केले, यासाठी त्यांच्या उपजीविकेची सोय केली.त्यांना जमिनीचे वाटप केले,यात भिल्ल, गोंड, गोवारी, बेरड,कैकाडी,वडार,बंजारा इ. यांचा समावेश होता.
*रयतेच्या सुखासाठी प्रचंड कार्य*:-
ग्रामपातळीवर गावपंचायत,एकूण जवळपास 3500 सांस्कृतिक केंद्रे निर्माण केली जी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची कर्तृत्व प्रेरणा आहे. रस्ते, घाट,अनेक ठिकाणी पाणीकुंड,बारव,विहिरी, तलाव,निवारा सोय म्हणून धर्मशाळा ,पाणवठे,पूल ,नियमित दररोज टपाल व्यवस्था पुणे ते महेश्वर,परराज्य राजदूत,राजधानी इंदौर हुन महेश्वर ला आणली.

कोतवाल,न्यायव्यवस्था,सतीबंदी,हुंडाबंदी केली.कुटुंबाला 20 झाडे शेतात, बांधावर लावणे ज्यात 11झाडे राज्यासाठी आणि 9 झाडे स्वतःसाठी वापरत असत.भारतभर सामाजिक कार्य केले,यात इंदोर,अंबड सह सोमनाथ, वाराणसी,केदारनाथ गंगोत्री येथे आजही साक्ष मिळते.
केदारनाथ येथील 3 हजार फूट उंचीवर असणारी धर्मशाळा आणि पाणीकुंड पाहून 1818 ला कॅप्टन स्टुर्ट सुद्धा आश्चर्य व्यक्त करतो आणि नोंद घेतो.होळकर शाहीचा साम्राज्य विस्तार हा निमाड,माळवा,राजपुताना, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश पर्यंत होता.
अहिल्यामाई होळकर यांचा 13 ऑगस्ट 1795 ला मृत्यू झाला.

*होळकरशाही चे कुलचिन्ह*:-
बैल-घोडा-सूर्य आणि मोडी लिपी शब्दात ,”जो प्रयत्न करतो त्यालाच यश प्राप्त होते.” ही सतत प्रयत्नवादाची शिकवण जी बुद्धभूषणम ग्रंथात संभाजी महाराज देतात,त्याची प्रचिती येते.
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी मुलींसाठी काढलेल्या शाळेला “अहिल्याआश्रम”नाव दिले.छ. शाहू महाराज यांनी आपली चुलत बहीणीचे लग्न होळकर घराण्यात केले.
1.अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करतांना ब्रिटिश संसद,त्यांना 18व्या शतकातील सर्वोत्कृष्ट शासनकर्ती महिला म्हणतात.2.प्रसिद्ध विचारवंत जॉन माल्कम म्हणतो,”अशी न्यायाधीश होणे नाही”. 3.जवाहरलाल नेहरू ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’या पुस्तकात अहिल्यामाई बाबत, ‘आदर्श राज्यकारभार, कर्तृत्ववान,नीट राज्य कारभाराची घडी बसविणारी राज्यकर्ती’.

4.बहेनजी मायावती यांनी 28 वर्ष राज्यकारभार केला म्हणून 28 फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा अलिगढ येथे उभारला आहे.

5.कवयित्री जोना बेली ही आपल्या कवितेत त्यांचा गौरव करते.

मात्र काही दुष्ट राघोबा पेशव्यांच्या औलादी आजही टीका करतात मे 2016 ला’तरुण भारत’ या दैनिकात दीपक दीक्षित हा सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो.तसेच एस.टी.प्रवर्ग आरक्षण बाबतही अशीच धोकेबाजी चालू आहे,ती डोळसपणे आपण समजून घेऊया,कारण आम्ही फार लवकर विसरतो? किती वर्षे झाली?गुलामगिरी झुगारून जिवंत,शाबूत मेंदूने विचार कराच. कारण आपण ‘इतिहास’ विसरू नये,तरच आपले वर्तमान आणि भविष्य चांगले असेल..

✒️रामेश्वर तिरमुखे,जालना(राज्यकार्याध्यक्ष,सत्यशोधक वारकरी महासंघ,महाराष्ट्र. व्याख्याते)मो:-9420705653