आरोग्य महायज्ञ शिबिराच्या माध्यमातून शेकडो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया !

29

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने शेकडो रुग्णांना मिळाला दिलासा !

🔸आ. देवेंद्र भुयार यांनी केले शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाट्न !

✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.29मे):- विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मोर्शी तालुक्यामध्ये भव्य आरोग्य तपासणी महायज्ञ शिबिराचे आयोजन करून आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली.आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, पोटातील गाठी या सारखे गंभीर आजाराचे निदान केलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णालय वरुड,येथे महात्मा फुले जन आरोग्य महायोजना अंतर्गत वरुड तालुक्यातील ज्या रुग्णांना हर्निया, हायड्रोसिल,अपेंडिक्स, पोटातील गाठी या सारखे गंभीर आजार आहेत त्या गंभीर आजाराचे मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत त्या अनुषंगाने आमदार देवेंद्र भुयार यांनी रुग्णांची प्रत्यक्षात भेट घेतली व वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आणि शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाट्न करण्यात आले.

इच्छा शक्ती असेल तर एखादा लोकप्रतिनिधी रुग्णसेवा करून शेकडो रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून मदत करून सामान्य माणसांना दिलासा मिळवून देण्यासाठी सामान्य माणसापर्यंत कसा पोहचू शकतो याचे आदर्श उदाहरण ठरत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी राबविलेल्या आरोग्य महायज्ञ शिबिराच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना सर्जरीसाठी व उपचारासाठी मोर्शी, वरुड, अमरावती, नागपूर, मुंबई येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. आरोग्य महायज्ञ शिबिरा अंतर्गत, आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून शेकडो रुग्णांची व बालकांची निःशुल्क शस्त्रक्रिया होत असल्यामुळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे .

मोर्शी वरुड येथे आरोग्य महायज्ञ शिबिरात हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, पोटातील गाठी, कॅन्सर, विविध गाठीची शस्त्रक्रिया, बालरोग, हृदयरुग्ण, अस्थीरोग, डोळ्यांची शस्त्रक्रिया, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, यासह विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या शेकडो रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे आढळले असून त्यांच्यावर निःशुल्क मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत असून या सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येत असून सर्वच रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आ. भुयार यांनी सांगितले.