येवल्यात वंचित बहुजन आघाडी चा.वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

93

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.1जून):– येवला शहरातील अहिल्यादेवी होळकर घाट येथील राजमाता अहिल्यादेवी यांचा भव्य दिव्य पुतळ्यास त्याचा २९७ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जयघोष करत अभिवादन करण्यात आले.वंचित बहुजन आघाडी चे येवला तालुकाध्यक्ष संजय पगारे, युवा नेते शशिकांत जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी वंचितचे युवक जिल्हा उपाधयक्ष दयानंद जाधव,भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव दिपक गरुड यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र मांडले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारताचा इतिहासात स्वकर्तुत्वाने महिलांना पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जगण्याचा मार्ग मोकळा करून सती जाण्याचा प्रथेला विरोध करून प्रथा.बंद केली
न्याय करत असताना आपला. व परका भेदभाव त्यांनी केला नाही प्रजाहित पाहताना राष्ट्रीय ऐक्य व राष्ट्रीय भावनेला जतन करीत १८ व्या शतकात जगातील उत्तम प्रशासक म्हणून त्याचा आदर्श घेत आजही महिलांना प्रेरणादायी ठरेल.

असे वक्तव्य वंचितचे तालुका अध्यक्ष संजय पगारे यांनी केले यावेळी साहेबराव भालेराव, मुकतार तांबोळी , दिपक गरुड,वसंत घोडेराव,निवृत्ती घोडेराव,युवक तालुका अध्यक्ष प्रवीण संसारे,ऋषी संसारे, हरिबाबा आहिरे, अतुल धीवर , दयानंद जाधव,शशिकांत जगताप, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड वालहुबाई जगताप , आदीसह उपस्थित होते