संभाजी ब्रिगेडचे ओबीसी आरक्षणाबाबत समर्पित आयोगाला निवेदन

31

✒️वर्धा,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

वर्धा(दि.2जून):- ओबीसी समाजाला राजकिय आरक्षण द्या. संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले यांची मागणी.
दिनांक २८ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे ओबीसी आरक्षणासंबंधी समर्पित आयोगासमोर वर्धा जिल्हा संभाजी ब्रिगेडचे प्रतिनिधी बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्वरत बहाल करण्यात यावे व ओबीसी ची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, याकरिता बाजु मांडली व निवेदन सादर केले.

बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले बोलत असताना म्हणाले की, केंद्र सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत हस्तक्षेप न करता महाराष्ट्र सरकारला इम्पिरिकल डेटा द्यावा.अन्यथा “जातीनिहाय जनगणना” हाच देशातील आरक्षण प्रश्नावर तोडगा आहे. ५० टक्के मर्यादेच्या अवतीभोवती देशात अनेक न्यायप्रविष्ट खटले आहेत. त्यांच्याबाबत तोडगा काढणं महत्त्वाचं आहे. लोकांची मागणी तुम्ही फार काळ दुर्लक्षू शकत नाही. जनगणनेनंतर अर्थातच टक्केवारीनुसार योग्य ते धोरण राबवता येईल.

१)ओबीसी हा देशाचा महत्त्वपूर्ण घटक आहे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये.
२)मध्यप्रदेश सरकारला जसे ओबीसी सह निवडणुका घेण्याचे अधिकार दिले तसेच महाराष्ट्रालाही द्यावे.
३)केंद्र सरकार ने ट्रिपल टेस्टसाठी ची अट मागे घ्यावी.
यावेळी उपस्थित पवणार सर्कलअध्यक्ष वैभव निखाडे हे होते.