प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना छत्री वाटप

✒️भंडारा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

भंडारा(दि.12जून):-प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, सम्राट अशोक सेना अखिल भारतीय अपंग ध्रुवतारा क्रांतिकारी संघटना, आधार रेस्क्यू फोर्स, सेल्फफंड रीलायझेशन सोशल एज्युकेशन सोसायटी तुमसर यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात व पत्रकारिता क्षेत्रात ज्यांचे विशेष योगदान आहे अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा वाढदिवस निमित्त छत्री वाटप कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते डी. जी. रंगारी सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, जीवना आधार फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष कुलदीप गंधे, सरपंच नंदलाल धुर्वे उपसरपंच गणेश बनकर, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर बागडे, विदर्भ चंडिकाचे पत्रकार दिगंबर देशभ्रतार, आयोजक श्रीकृष्ण देशभ्रतार, मनोज भालाधरे, वर्षाताई देशभ्रतार, मधुकर कोहाडे, मंजुषा देशभ्रतार, हरिदास बोरघरे व गायधने आदी मान्यवर उपस्थित होते. अशोक सम्राटचे नेते अध्यक्ष तुळशीराम गेडाम यांनी आपल्या भाषणात सम्राट अशोक यांनी भारत देशाचे कार्य केले. त्या कार्याविषयी व त्यांच्या उपकारा विषयी सभेत माहिती दिली.

सम्राट अशोक सेना आणि सामाजिक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून अशोक सम्राट यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अशोक सम्राट सेना ही संघटना करीत असल्याचे सांगितले. अचल मेश्राम यांनी सामाजिक जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतात, अडचणी येतात त्या अडचणी व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम यांनी सांगितले. लोकांवर अन्याय अत्याचार होतात या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात आणि लेखणीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्नांना वाचा फोडून सरकार व अधिकाऱ्यापर्यंत त्यांचे प्रश्न मांडत असतात असे मत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी .जी. रंगारी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच नंदलाल धुर्वे, उपसरपंच गणेश बनकर, कुलदीप गंधे, पंकज वानखेडे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये गोरगरीब लोकांना छत्री वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे सामाजिक क्षेत्रात यांचे विशेष योगदान आहे अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये अशोक सम्राट सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, कुलदीप गंधे, श्रीकृष्ण देशभ्रतार, सरपंच नंदलाल धुर्वे, गणेश बनकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक पत्रकार श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय किरणापुरे, राजू उपरीकर, राजेश गिरडकर सम्राट अशोक सेनेचे तुमसर तालुका अध्यक्ष हरिदास बोरघरे, मुकेश बोरकर, चैत्राम किरणापुरे, रवी शेंडे, विजय उपरीकर, कार्तिक कोसरे, सुरेंद्र केवट ,अरविंद नगरधरे, गंगाधर बागडे, संजय बोरकर, व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED