ससून रुग्णालय च्या जनमाहिती अधिकारी यांचा १० रुपये रोख कॅश घेण्यास नकार- राज्य माहिती आयोग पुणे कडे कलम १८ नुसार तक्रार दाखल

30

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

पुणे(दि.14जून):- दिनांक 1 जून रोजी स्वाती नेटारे यांच्या संदर्भात लोकमत मध्ये बातमी प्रकाशित झाली होती ती बातमी वाचून अर्जदार अब्राहाम आढाव माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी ससून रुग्णालयात दोन जून रोजी माहितीचा अधिकार अर्ज दाखल करून माहिती मागणी साठी विनंती केली परंतु अर्जदाराकडे तीन अर्ज होते म्हणून जन्म माहिती अधिकाऱ्याने ते अर्ज स्वीकारले नाही जन माहिती अधिकारी गणेश बडदरे यांनी अर्ज तपासली तर एका अर्जावर दहा रुपयाचे कोर्टाची तिकीट लावले होते.

म्हणून अर्ज स्विकारला परंतु राहिलेले दोन अर्ज देताना जन माहिती अधिकारी यांनी विचारले की सदर अर्जावर दहा रुपये तिकीट नाही अर्जदार यांनी दोन अर्जासाठी वीस रुपये रोख देतो असे सांगितले असताना सदरच्या जनमाहिती अधिकारीने गणेश बडदरे यांनी स्वीकारण्यास नकार दिला अर्जदारांनी सांगितले की कलम १८ प्रमाणे आम्ही राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करू कारण अर्जदाराचे रोख रक्कम स्वीकारून पावती देणे आपणास बंधनकारक आहे तरी आपण रोख शुल्क स्वीकारत नाही म्हणून आपल्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले असतानाही जन माहिती अधिकारी यांनी सांगितले की आम्ही माहिती आयोगाला मला घाबरत नाही आम्ही माहिती आयोगाकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता आम्ही तुमचे रोख रोख रक्कम स्वीकारणार नाही

आम्ही एकही अर्ज रोख स्वरूपात शुल्क असलेला घेत नाही तरी तुमचा अर्ज स्वीकारण्यासाठी तुम्हाला दहा रुपयाचे तिकिट लावावे लागेल माहितीचा अधिकार अधिनियम 2005 पासून या देशांमध्ये कायदा लागू झाला परंतु सोळा वर्ष सहा महिने झाले तरी अजूनही जन माहिती अधिकारी यांना माहिती अधिकाराचं पुरेसे ज्ञान नाही माहिती अधिकाराचा शुल्क रोख स्वरूपात ,पोस्टल ऑर्डर ,बँकर चेक किंवा आपण कोर्टाचे तिकीट, लावून तो अर्ज देऊ शकतो तरीही जन माहिती अधिकारी हट्ट धरतात की कोर्टाचे १० रू तिकीट लावा कायद्याचं परिपूर्ण ज्ञान नसल्याने अनेक अर्जदारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे , सदर त्रासाला कंटाळून अर्जदार यांनी ३ जून रोजी राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.लवकरच राज्य माहिती आयुक्त पुणे यांचा निकाल देईल आणि जन माहिती अधिकार्‍याला दंड होईल.