कुरुल जिल्हा परिषद शाळेकडून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत

31

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.16जून):-शालेय शिक्षण प्रवेशाचा दिवस शाळा सुरु झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद उत्साह दिसून येत होता. कोरोनामुळे मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षण पद्धती असल्याने विद्यार्थी शाळेपासून दूर गेला होता. सध्या कोरोणनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शैक्षणिक वर्ष वेळेत 15 जून पासून सुरू झालेले आहे. पहिल्या दिवशी शाळेमध्ये दुसरी ते चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद चेहऱ्यावरती पहावयास मिळत होता. तर पहिलीच्या वर्गामध्ये काहींच्या चेहऱ्यावरती हसू तर काहींच्या चेहऱ्यावरती रडु दिसत होते.

शाळेमध्ये दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आणि मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे सरांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुल ग्रामपंचायत सरपंच चंद्रकला पाटील, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा चंद्रकला पाटील, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुहास घोडके, शिक्षण तज्ञ स्वाती लांडे सदस्य नानासाहेब ननवरे, केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे सर मुख्याध्यापक मुचंडे सर, यांच्या हस्ते करण्यात आला. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन व खाऊ वाटप करून स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आला. मंथन परीक्षा मध्ये संस्कृती घोडके हिने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार सुहास घोडके व शिक्षण तज्ञ स्वाती लांडे व सचिन शिंदे सरांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार समाधान गोवर्धनकर यांनी मानले. यावेळी कुरुल गावचे सरपंच चंद्रकला पाटील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुहास घोडके शिक्षण तज्ञ स्वाती लांडे सदस्य नानासाहेब ननवरे, पालक गणेश सलगर, सचिन जाधव, बबन दुधाळ, मुख्याध्यापक मुचंडे सर, केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे , शिक्षक कांबळे सर, शिंदे सर, गोवर्धनकर सर शिक्षिका सोनवणे मॅडम ,तोरखडे मॅडम,लामतुरे मॅडम आदी सह उपस्थित होते.