स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर जोरदार निदर्शने

28

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

🔹महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

येवला(दि.17जून):- आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहरातील विंचुर चौफुलीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महेंद्रभाऊ पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्मारका समोर पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा अनकुटे सावखेडे सोसायटीचे चेअरमन महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर जोरदार निदर्शने करण्यात आली घोषणाबाजीने संपुर्ण परिसर दणाणून सोडला होता यावेळी बाळासाहेब आहिरे एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष शांताराम पवार अँड. स्मिता झाल्टे आशा आहेर यांची ही भाषणे झाली.

यावेळी महेंद्रभाऊ पगारे यांनी आपल्या भाषणात सरकार वर जोरदार टिका केली ते म्हणाले की 2016 मध्ये कर्ज माफी झाल्या नंतर शेतकर्याना पिक कर्ज उपलब्ध करून शेतकर्याना दिलासा देयाला पाहिजे होता परंतू विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या मार्फत पिक कर्ज देण्यासाठी एन डी सी बॅंकेकडे पैसे नाही म्हणून शेतकरी आपला जमिनीचा 7/12 सावकरा कडे पतसंस्था कडे गहाण ठेऊन पुन्हा कर्ज बाजारी होत आहे असेच होत राहिले तर थोड्याच दिवसात पुन्हा शेतकरी कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करतील त्यातच कांदा ला भाव नाही बियाणे व खते खुप महाग झाले म्हणुन शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष असुन शेतकर्याना वाली कोण असे प्रश्न चिन्ह निर्माण झाला म्हणून अशा वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या आंदोलनात शेकडो लोक सहभागी झाले होते आहे जर आदोलानाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा बोलताना महेंद्रभाऊ पगारे यांनी दिला

आंदोलन स्थळी नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर मॅडम यांनी निवेदन स्विकारले यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने उपस्थित होता
खालील मागण्या……

1. शेतकऱ्यांना पिक कर्ज एन. डी. सी सी. बँक मार्फत तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्या.
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेची अमल बजावणी करण्यात यावी .
3.नवीन केशरी रेशन कार्ड धारकांना अल्पदरात धान्य तात्काळ वाटप करण्यात यावा.
3.पंतप्रधान घरकुल योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात यावी.
4. कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना तात्काळ पेन्शन योजना चालू करावी .
5.कांदा निर्यात तात्काळ करावी .
या प्रमुख मागण्यांची दाखल प्रशासनाने घेतली नाही तर यापुढे स्वरूप च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

निवेदन देतेवेळी महेंद्रभाऊ पगारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड बाळासाहेब अहिरे,शांताराम पवार मयूर सोनवणे, विनोद त्रिभुवन,बाळासाहेब सोनवणे बाळासाहेब गायकवाड गौतम पगारे अतुल धिवर महेंद्र खळे समाधान गुंजाळ नवनाथ पगारे विजय पगारे वाल्मिक तळेकर नाना पिपळे अतुल सोनवणे बाळू चंदन सौ.आशा आहेर अॅड स्मिता झाल्टे ज्योती पगारे नयना सोनवणे संगीता रणधीर यांच्या सह शेकडो महीला व पुरूष उपस्थित होते.
या आंदोलनाला एकलव्य संघटनेने जाहीर पाठींबा दिला बाळासाहेब अहिरे,शांताराम पवार मयूर सोनवणे, विनोद त्रिभुवन,बाळासाहेब सोनवणे बाळासाहेब गायकवाड गौतम पगारे अतुल धिवर महेंद्र खळे समाधान गुंजाळ नवनाथ पगारे विजय पगारे वाल्मिक तळेकर नाना पिपळे अतुल सोनवणे बाळू चंदन सौ.आशा आहेर अॅड स्मिता झाल्टे ज्योती पगारे नयना सोनवणे संगीता रणधीर यांच्या सह शेकडो महीला व पुरूष उपस्थित होते.
या आंदोलनाला एकलव्य संघटनेने जाहीर पाठींबा दिला