उमरखेड येथे रिपब्लिकन युवा सेनेची रुपाळा (अंबवन) युवती आघाडीची शाखा गठीत

30

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो.9823995466

उमरखेड दि.20जून):-सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोंगडे यांच्या सूचनेप्रमाणे व जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जून 2022 रोजी नागापूर रूपाळा (अंबवन) ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे रिपब्लिकन युवा सेना युवती आघाडीची शाखा गठित करण्यात आली.

याप्रसंगी रिपब्लिकन युवा सेनेचे पदाधिकारी दिलीप मुनेश्वर साहेब यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले तर शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

तसेच सुनिल पाटील चिंचोलकर यांनी नागापूर रूपाळा येथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व ग्रामस्थांशी विविध विषयावर संवाद साधून मार्गदर्शन केले.

शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर यांच्या हस्ते रिपब्लिकन युवा सेना, युवती आघाडी रूपाळा (अंबवन) शाखा अध्यक्ष पदी सौ.कौशल्या गणेश आगलावे यांना नियुक्त पत्र देऊन शाखा कार्यकारणी पुढील प्रमाणे सौ.अन्नपूर्णा सु. खोकले (उपाध्यक्ष), सौ.आशाबाई अ. लोखंडे (सचिव), सौ. लिलाबाई श. दिवेकर (कोषाध्यक्ष),सौ. गयाबाई कांबळे (सहसचिव), सदस्य महेरूनिसा अ. खान, सैकुनीसा शेख जावेद, सौ. शांताबाई स.नरवाडे,सौ. दीक्षा प्र. कांबळे,सौ. गयाबाई कांबळे जाहीर करण्यात आली.

ह्या वेळेस संभाजी हापसे, दिलीप मुनेश्वर, गणेश आगलावे, सोनु दिवेकर, मंगेश पाईकराव, शांताबाई पाटील, सीताबाई सरवळे, गयाबाई कांबळे, गंगाबाई दिवेकर, आशाबाई लोखंडे, सुलोचनाबाई आगलावे, अन्नपूर्णा खोकले, अनुसयाबाई टाळके, शांताबाई नरवाडे, महेरूनिसा खान, सैकुनीसा शेख, दीक्षा कांबळे, गयाबाई कांबळे व इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.