औदुंबर नगरीतील जनतेनी पोलीस कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीचा दिला निरोप

32

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.3जुलै):-स्थानीक पोलीस स्टेशन येथे गोपनीय शाखेमध्ये निर्भीड, निपक्ष कर्तव्य बजावणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक कांबळे यांना औदुंबर नगरीतील जनतेने सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त केला सत्कार दीपक कांबळे यांचा पोलिस खात्यात सेवा कार्यकाल पूर्ण 30 वर्ष 6 महीने नौकरी करुन आपले कर्तव्य बजावले याच निमित्त यांचा सेवानिवृत कार्यकम राज्यस्थानी भवन येथे आयोजित करण्यात आला होता.

याप्रंसगी पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, तहसीलदार आनंद देउळगावकर, यांच्या हस्ते सत्कार मुर्तीचे सत्कार करण्यात आले.व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी तथा राजकीय पक्षातील नेते गन उपस्थीत होते त्यातच अयुब्ब पठाण , काझी सर, विशाल गिरी, रमेश चव्हाण, बाळासाहेब ओझलवार, चितागराव कदम यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चिंतागराव कदम यांनी दीपक कांबळे यांचे पोलीस विभागाला दिलेल्या सेवेबद्दल कौतुक केले व सेवानिवृत्त नंतर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भाजपा तालूका सरचिटणीस विशाल गिरी यांनी दीपक कांबळे यांचा तळागळातील नागरिकां सोबतचे संपर्क पाहून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपा कडून उमेदवारी देण्याचे जाहीर केले.यावेळी डॉ आंबेजोगाईकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम भट्टड, मझरउल्ला खान, तालुक्यातील पोलीस पाटील संघटना व शहरातील विविध मान्यवर आणि दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे पत्रकार बांधवांनी दीपक कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल माळवे, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड, पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके, दराठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चपाईतकर ,बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप बोस, वाहतूक शाखेचे निरीक्षक खेडेकर, उपपोलीस निरीक्षक विनीत घाटोळ, गोपनीय शाखेचे संतोष राठोड यांनी सत्कारमूर्तीचा संपुर्ण विभागा तर्फे सत्कार केला व सेवानिवृत्तीचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.