“मॉडर्न पब्लिक स्कूल” चा विद्यार्थी प्रत्येक प्रतियोगितेमध्ये सरस ठरणार ! – राम देवसरकर (अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज)

32

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.3जुलै):- येथील गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मॉडर्न पब्लिक स्कूलची पालक सभा पार पडली.यावेळी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज अध्यक्ष रामदेव सरकार यांनी बोलताना मॉडर्न पब्लिक स्कूलचा विद्यार्थी हा फक्त अभ्यासातच हुशार राहणार नसून यासोबत त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रतियोगितेमध्ये तो अव्वल राहिला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून शाळेची वाटचाल सुरू आहे.

म्हणूनच शाळेच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येक विषयात निपुण करण्याचे काम संपूर्ण स्टाफ आणि नव्यानेच रुजू झालेले डायरेक्टर एडवर्ड राज करीत आहेत एडवर्ड राज यांना मागील 34 वर्षांचा शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव आहे ते प्रवरानगर निवासी शाळेचे प्रिन्सिपल राहिलेले आहेत.तसेच यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांना आठ नऊ दहा या वर्गासाठी एडवर्ड राज यांनी प्रवरानगर येथे शिक्षण दिले.

याप्रसंगी एडवर्ड राज यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणतीही वस्तू आयुष्यात सहजपणे मिळाली तर तिचे मूल्य कमी होते त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना वस्तू उपलब्ध करून देताना ती वस्तू मिळवण्यासाठी करावे लागणारे कष्ट विशद करून त्या वस्तूचे मूल्य विद्यार्थ्यांना अवगत करून द्यावे तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या यशासाठी कुणीतरी कष्ट करत आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.सदर पालक सभेलाअसोसिएट डायरेक्टर मंजुषा राज, मॉडर्न मॉडर्न पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल दिपाली खेडे शाळेचे व्यवस्थापक सुधीर तवर, कैलास सूर्यवंशी सर्व स्टाफ पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.