रिमझिम पावसामध्ये कुरुल येथील अंगणवाडी मधील बालगोपालांचा ज्ञानभा तुकाराम गजरामध्ये प्रभात फेरी

32

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

मोहोळ(दि.9जुलै):- तालुक्यातील कुरुल गावातील अंगणवाडी व माळी वस्ती मधील बालगोपालांनी आषाढी एकादशी निमित्त कुरुल गावातून रिमझिम पाऊस सुरू असतानाही ज्ञानभा तुकाराम च्या जय गोशामध्ये गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विठ्ठल रुक्माई च्या वेश्यामध्ये बालगोपाल ही प्रभात फेरी अंगणवाडी पासून राम मंदिर विठ्ठल मंदिर हनुमान मंदिर येथे मध्ये विठ्ठलाची आरती करण्यात आली व बालगोपालांना खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी अंगणवाडी मधील शिक्षका ननवरे मॅडम ,माने मॅडम, कुंभार मॅडम, गायकवाड मॅडम, मदनीस भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब तात्या जाधव प्राध्यापक माऊली सर पत्रकार सुभाष शिंदे ,सुनील आंबरे, संतोष जाधव , पखवाज वादक सुरवसे, नागनाथ वसमळे,आदीसह व ग्रामस्थ उपस्थित होते