आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन घेऊन श्री संत जनाबाई जन्म स्थळी परतल्या- हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत व ढोल ताशाच्या गजरात पालखीचे स्वागत

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17जुलै):-पंढरीची वारी (आषाढी वारी) ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. ही पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा एक भक्कम असा आधार आहे.आज लाखो लोक शेकडो दिंड्यांतून चालत पंढरीच्या आषाढी यात्रेला येतात. ही पायी वारीची परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची पालखी पुण्याहून पंढरपूर कडे रवाना होते, पण वारीची ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासूनही चालू होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते. ते ज्ञानदेवांना व इतर मुलांना पंढरीच्या वारीला घेवून गेले.

आधी रचली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।।

असे पंढरीचे समृद्ध असे वर्णन संत नामदेव यांनी करून ठेवले आहे. असे हे पंढरपूर हजारो वर्षांपासून आहे आणि त्या पंढरीची वारी ही नित्य नियमाने केली जाते.हजारो वर्षाची वारी परंपरा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील संत परंपरेत गंगाखेड येथे जन्म झालेल्या श्री संत जनाबाईंचे योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. या पवित्र भूमीतून श्री संत जनाबाईंच्या पादुका पांडुरंगाच्या दर्शना करिता पंढरपुराकडे नेण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे.आषाढी एकादशी निमित्त श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेड येथे अनेक उपक्रम राबवले जातात. दिंडीतून आलेल्या वारकऱ्यांची सेवा करणे, त्यांचे आरोग्याची तपासणी करून त्यांना योग्य तो औषधोपचार करणे, अन्नदान, फळ वाटप व पाणी वाटप, गरम चादरीचे वाटप, मंदिराची सजावट करणे असे विविध उपक्रम राबवले जातात. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे हे या संस्थानाचे अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ रेखा रत्नाकररावजी गुट्टे यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले व तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी इतर महिलांच्या सहकार्याने श्री संत जनाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.

श्री संत जनाबाईंच्या दर्शनाकरिता शेकडो दिंड्यातून येणाऱ्या हजारो वारकऱ्यांची सौ रेखा रत्नाकररावजी गुट्टे, दिनकरराव मुंडे, देवस्थान संस्थानाचे सर्व संचालक मंडळ, सवंगडी कट्टातील सदस्य सेवा करतात तर गंगाखेड येथील डॉक्टर त्यांची आरोग्य तपासणी करून योग्य तो औषधोपचार करून त्यांचे आरोग्य उत्तम राहण्याची काळजी घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी तीस हजारापेक्षा अधिक नागरिकांनी श्री संत जनाबाईंचे दर्शन घेतले. श्री संत जनाबाईच्या पालखी प्रस्थानाच्या व शहरातील आगमनाच्या वेळी हजारो वारकरी पालखी सोबत होते. यात महिलांची विशेष व लक्षणीय उपस्थिती होती. श्री संत जनाई, श्री कृष्णाई, श्री संत मोतीराम महाराज, श्री रेणुका माता, श्री दुर्गा देवी, श्री गंगा माता, आणि श्री संत जनाबाई महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी विविध अभंग गात, फुगडी खेळत गंगाखेड येथील परळी नाका ते संत जनाबाई संस्थानापर्यंत पालखीचे स्वागत केले. यावेळी पुरुष व महिला कीर्तनकार सर्व भजनी मंडळ आणि संस्थानाचे विश्वस्त उपस्थित होते.

या निमित्ताने गंगाखेड नगरीत येणारे सर्व वारकरी, भजनी मंडळी, कीर्तनकार व सेवार्थी यांचे सौ रेखा रत्नाकररावजी गुट्टे, गंगाखेडचे तहसीलदार मा. गोविंद येरमे, डॉ. हेमंत मुंडे, संस्थानाचे विश्वस्त अनिल यानपल्लेवार, ॲड. संतोष मुंडे, दिनकरराव मुंडे, जगदीश तोतला, सुभाषराव नळदकर, गोदावरीताई मुंडे यांनी संस्थानाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. या याप्रसंगी ह.भ.प. अच्युत महाराज किरडे, ह.भ.प. विनायक महाराज गुट्टे गुरुजी, ह.भ.प. माणिक महाराज नाव्हेकर, ह. भ.प. बाळू महाराज बहादुरे, ह.भ.प. नागेश महाराज भिसे, ह.भ.प. बाळू महाराज लटपटे, पांडू महाराज रेवनवार, मायाताई रमेश औसेकर, मंगलताई कृष्णाजी सोळंके, रेणुताई प्रकाश घन, दिपालीताई पाठक, नगरसेवक राधाकिशन शिंदे, वैजनाथ टोले, राजश्रीताई नळदकर, कल्पनाताई, शेलकाताई जाधव, मनीषाताई मानकर, शीलाताई यानपल्लेवार आदी उपस्थित होते. आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे हे या संस्थानाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून संस्थानाची अधिक भरभराटी होत असल्याचे चित्र आपणास पहावयास मिळत आहे.