प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची भोकर तालुका कार्यकारिणी जाहीर

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

भोकर-नांदेड (दि.20जुलै):-आज दि.१९ जुलै,२०२२ रोजी शासकिय विश्रामगृह भोकर येथे पत्राकारांची बैठक घेण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यावेळी पत्रकाराच्या समस्या, अडी अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली .प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना महाराष्ट्रात पत्रकारावर होणारे अन्याय थांबवत असून अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य करीत आहे. भोकर येथील शहरी ग्रामीण पत्रकारांनी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची भोकर तालुका कार्यकारिणी अशी : भोकर तालुका अध्यक्ष पदी उत्तम कसबे, उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड, सचिव सुभाष नाईक, सल्लागार गोविंद सुर्यवंशी, तालुका संघटक मोहंमद सुजाओदिन मो. फयोजोदिन, सदस्य म्हणून माधव गायकवाड, रमेश पोलकमवार यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापुरकर, सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, उद्धव मामडे, सरचिटणीस जे. हरविंदर सिंघ संधू, सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED