चोराच्या उलट्या बोंबा-अवैध दारू विक्रेत्याकडून दुसऱ्या दारू विक्रेत्यास धमकी

41

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 27 जुलै):- तालुक्यातील परिसरात नावा रूपाने आलेल्या राजकीय मोठ्या नेत्याची चमचेगिरी करून तालुक्यात परिचित झालेला आणि जिल्ह्यातील दारूबंदीच्या काळापासून अवैद्य दारू विक्री करून लाखोंची माया जमा केलेला आणि याच पैशावर निवडणूका लढवून एका राजकीय पक्षात स्थान मिळवून चेलेगिरी करणारा स्वतः अवैध दारू विक्री करतो. मात्र याच परिसरात काही गरीबांनी चार पाच दारूच्या निपा विकून कुटुंबास आर्थिक हातभार लावतात. अशा गरीब लोकांना तो अवैद्य दारू विकणारा मोबाईल वरून व त्यांचे घरी जाऊन दारू विकू नका? नाहीतर पोलिसाच्या स्वाधीन करीन अशी धमकी देतो.

मात्र स्वतः अवैध दारू विक्री करुनही त्याचेवर अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. ही आश्चर्याची बाब असून हा गोरख धंदा मोठया प्रमाणातब्रम्हपुरी शहरात व तालुक्यात बघायला मिळत आहे. कायदे हे सर्वसामान्य माणसासाठी आणि प्रामाणिक माणसांसाठी आहेत का? या अवैद्य दारू धंदे करणा यावर ब्रह्मपुरी पोलीस कारवाई का करत नाही ? अवैध दारू विक्रेत्या सोबत पोलीस स्वतःहीत संबंध जोपासून संगणमत करून आपण किती कर्तव्यदक्ष आहोत. हे फक्त आणि फक्त सर्वसाधारण जनतेलाच दाखवतात. कायदा, न्याय हा सर्वांसाठी समान आहे. परंतु पोलिसांच्या या कर्तृत्वामुळे सर्वसाधारण व्यक्ती पोलिसांवर विश्वास ठेवत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.

कायदे फक्त गरिबांसाठी असतात, तर माया जमा करण्यात अवल असणाऱ्या सत्ताधा-यांशी संगनमत करून त्यांच्या राजाश्रयाच्या बळावर वाट्टेल तसे अवैध व्यवसाय व मुजोरी या चेल्या चपात्या मध्ये माजली आहे. अशांना एक दिवस जनता रस्त्यावर उतरून धडा शिकविण्याची गरज आली असून तो दिवस नक्कीच येईल यात काहीही शंका नाही.