संत सांवता महाराज यांची पुण्यतिथि निमित्त शोभायात्रा व विविध कार्यक्रम…

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.28जुलै):- येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांच्यावतीने संत शिरोमणी सांवता महाराज यांची पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. आज सकाळी समाज मंदीरात संत सांवता महाराज यांची प्रतिमेची विधीव्रत पुजन करण्यात आले तर दुपारी ११ ते ३ वाजे दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला संध्याकाळी ६ वाजता ढोल ताशे चा गजरात लेझिम पथकासह महाराजांची पालखी मिरवणुक काढण्यात आली.सदर मिरवणुक समाज मंदीरा पासुन लहान माळी वाडा परिसरातुन तेली तलावाचा बाजुस असलेल्या सिध्दी हनुमान मंदीरा जवळ समारोप करण्यात आला.

त्या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, माळी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, विलास महाजन जेष्ठ पत्रकार कडू महाजन, सचिव पुंडलिक महाजन, राजेंद्र महाजन, गुलाब बळीराम महाजन,दिलीप महाजन, रघुनाथ महाजन,दिपक महाजन, हर्षल महाजन, श्रीराम महाजन, धिरज महाजन, चेतन महाजन, विजय महाजन, शांताराम महाजन, आनंद पाटील, गणेश बापु पाटील, भैय्या पाटील, जितेंद्र पाटील, पंकज पाटील सह माळी,पाटील, तिळवण तेली समाज तसेच मराठे समाज चे पंच मंडळा सह समाज बांधव मान्यवर उपस्थित होते.

धरणगाव, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED