राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सूर्योदय कराटे क्लबच्या खेळाडूचे यश

63

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.2ऑगस्ट):-राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील सूर्योदय कराटे क्लबच्या खेडाळूचे यश.गीचीन शोतोकन कराटे असोसिएशन भारत तर्फे आयोजित तिसऱ्या गीचीन शोतोकन राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2022 मध्ये कारंजा येथील सूर्योदय कराटे क्लबचा विद्यार्थी अर्णव क्षीरसागर याने प्रथम पारितोषिक प्राप्त केले.ही स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित करण्यात आली होती.संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून व तालुक्यातून कराटे खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

ही कराटे स्पर्धा दिनांक 31 जुलै 2022 ला धनसोनस हॉल नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती.मनीष सूर्यवंशी ,मुकेश ठाकरे ,दुर्गेश लव्हारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कराटे स्पर्धेत कारंजा येथील सूर्योदय कराटे क्लबचे विद्यार्थी झीयान शेख ,प्रतीक घागरे ,प्रणय घागरे, यश सलामे ,मोर्या गोंडे ,सर्वंश्री नासरे यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले.विजयी खेडाळूनी त्यांच्या यशप्राप्ती चे श्रेय पोलीस कराटे प्रशिक्षक मुकेश ठाकरे, कुणाल दुर्गे ,पिंटू सावरकर ,मंगेश खंडारे यांना दिले.