महसूल विभागातर्फे योगेश फुके यांना तालुका उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार

73

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.5ऑगस्ट):-१ ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महसूल दिनाचे औचित साधून नांदगाव तहसील येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. इब्राहिम चौधरी सर ( उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे.) आणि नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा. पुरुषोत्तमजी भुसारी साहेब उपस्थित होते. यावेळी महसूल दिनानिमित्त विभागाशी संलग्नित कर्मचाऱ्यांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पोलीस पाटील हा महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून मानला जातो. याप्रसंगी महसूल प्रशासनाचा घटक म्हणून पोलीस पाटलांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तालुका पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटलाबद्दल अहवाल मागून तालुका उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराकरिता योगेश फुके निवड करून माननीय इब्राहिम चौधरी साहेब ( एच.डी.ओ.चांदूर रे.) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. येणस येथील पोलीस पाटील असलेले योगेश फुके हे पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत.

कोरोनाच्या संघर्ष काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यापूर्वी त्यांना पॉवर ऑफ मिडिया अमरावती तर्फे गौरविण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना यांच्यातर्फे दिल्या जाणारा ‘कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा पोलीस पाटील पुरस्काराचे ‘ मानकरी देखील योगेश फुके राहिलेले आहेत.महसूल विभागातर्फे तालुका उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराकरिता निवड झाल्याबद्दल पोलीस पाटील योगेश फुके यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याबद्दल त्यांनी माननीय इब्राहिम चौधरी साहेब उपविभागीय अधिकारी, तहसीलदार मा. पुरुषोत्तमजी भुसारी साहेब, ठाणेदार मा. विशालजी पोळकर साहेब, पोलीस पाटील संघटनेचे सर्व सहकारी पोलीस पाटलांचे आणि मित्र परिवारांचे आभार मानले.

.