दिव्यांग कार्यालय सो.आयुक्त कार्यालय पुणे: ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडून निवेदन

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.5ऑगस्ट):-दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख साहेब याना शिव पराशऋषी बहुद्देशीय सामाजिक मंडळ पोहोरगाव ता पंढरपूर जिल्हा सोलापूर चे दिव्यांग पुनर्वसन मार्गदर्शन व मार्गदर्शन केंद्रचे अध्यक्ष –ज्ञानेश्वर गायकवाड सह अपंग जनतादल सामाजिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रदिप कामटे व झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे आणि खजिनदार दादासाहेब काशीद व आण्णा भोसले सह यानी दिव्यांगआयुक्त याना दिव्यांग सेवा आश्रमास मान्यता मिळावी व स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील वित्त आयोगातील ५% राखीव निधी वाटण्याबाबत जसे की , सार्वजनिक उपक्रम व दिव्यांग बचत गट याना कर्ज वाटप व ५०% घरफळा आणि मनोरंजन केंद्र व किरकोळ साहित्य सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशा आशायाचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सिओ साहेब याना परीपत्रक काढुन कळवावे .

तसेच आपल्या कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्यातील पंचायत समिती,जिल्हा परिषद व बसस्थानक या ठिकाणी दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांची चोकशी करून दोन दिवस चालू असणारे दिव्यांग कक्ष तीन किंवा पाच दिवस चालु ठेवणारे परीपत्रक काढावं अशा वरील तीन विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अधिकारी यांच्या समवेत तिमाही मिटींग घेऊन जिल्ह्यातील दिव्यांगच्या समस्या जाणून घेण्याची माहिती दिव्यांग सिशष्ठ मंडळाला देण्यात आले. व दिव्यांग आयुक्त यांच्या कनिष्ठ अधिकारी यानी आयुक्त यांच्या सर्व सुचना डेली डायरीत नोंदवून दिव्यांगच्या समस्याचे निर्सन करणार असल्याचे सांगितले.व निवेदन देऊन आभार व्यक्त केले.आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED