आदर्शमाता प्रतिष्ठानचे हे महान कार्य – माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील

34

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.10ऑगस्ट):-आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या माध्यमातून ध्येय आणि उद्देश याप्रमाणे कार्य करीत असताना समाजासाठी आपल्या जीवनातील अनमोल वेळ देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून खऱ्या अर्थाने पडद्यामागच्या लोकांना उजेडात करण्याचे महान कार्य प्रतिष्ठान करीत असल्याचे गौरवोद्गार माजी सहकारमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांनी काढले.

पाडळी( केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती च्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय बहुजन नायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍड.दिपक शशिकांत माळी यांना अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय बहुजन नायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आ.पाटील बोलत होते. वारुंजी चे उपसरपंच अनुज पाटील, कराड नगरपालिकेचे नगरसेवक सौरभ पाटील (तात्या) यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सौ.संगीता बहिरू मोहिते, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि पाडळी (केसे) ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा बडेकर, प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, अनिल बडेकर, संभाजीराव भोसले, प्रथमेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले, प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर सामाजिक संस्था म्हणून कार्यरत आहे, प्रतिष्ठानचे लॉक डाऊन काळातील कार्य खरच कौतुकास्पद असून या सामाजिक कामाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणार्‍या पडद्यामागच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना उजेडात आणण्याचे महान कार्य प्रतिष्ठान करीत आहे. हीच विचारधारा यापुढे प्रतिष्ठान ने जपावी अशी अपेक्षाही आ.बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली