स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जी.एस.नगरमध्ये वृक्षारोपण…

28

🔹मुख्याधिकारी यांचा जन्मदिवस वृक्षारोपण करून उत्साहात साजरा !

🔸सर्व कॉलनी परिसरात झाडे लावून त्यांचे संवर्धन करू व कॉलनी वासियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू – जनार्धन पवार[ न.पा.प्रशासक ]

✒️पी.डी.पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगांव(दि.11ऑगस्ट):- माझी वसुंधरा अभियानांतर्गत धरणगाव येथील जी.एस.नगरातील नागरिकांनी दि. ११ ऑगष्ट, २०२२ रोजी गुरुवारी सकाळी ११.३० वाजत ओपनस्पेस मध्ये मा.मुख्याधिकारी जनार्दन पवार साहेब [न.पा.प्रशासक] यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.रक्षाबंधनाचे औचित्य साधून पिंपळ, लिंब, गुलमोहर, सीताफळ आदि पंधरा रोपांची लागवड करण्यात आली. आणि वृक्षारोपणाच्या नंतर झाडांना राख्या बांधून आनंद व्यक्त करण्यात आला. वृक्षाचे संवर्धन संगोपनासाठी शपथ घेण्यात आली.नगरपालिकेतर्फे पंधरा झाडे आणि ट्रीगार्ड देण्यात आले. याप्रसंगी मा.मुख्याधिकारी तथा न.पा.प्रशासक जनार्दन पवार यांना काँलनी वासियांनी विविध प्राथमिक सुविधांसाठीचे निवेदन देण्यात आले. अंतर्गत रस्ते डांबरी करणे, पथदिवे, ईलेक्ट्रीक पोल, गटारी व ढापेटाकणे, व्यायाम शाळा, वाचनालय, सामाजिक सभागृह आणि ओपनस्पेसला तार कंपाऊंड करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे मुख्याधिकारी साहेबांनी आश्वासन दिले.

मुख्याधिकारी जनार्दन पवार साहेबांचा जन्मदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विनायक कायंदे, सुनील कोळी, अशोक कोळी, बबलू पवार, बाळू अत्तरदे, माळी सर, पवार सर, नरेंद्र पाटील, बी.एम.सैंदाणे, प्रशांत सुर्यवंशी, गिरधर मोरे, महेंद्र सैनी, नितीन मराठे, भगवान पारधी, डॉ.जितेंद्र पाटील, आदींनी परिश्रम घेतले आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली. या प्रसंगी नगरपालिकेचे अभियंता प्रणव पाटील, निलेश वाणी, कल्पेश चौधरी आणि कर्मचारी वृंद, तसेच कृष्ण गीता नगर, जी.एस.नगर, विजय शांतीनगर येथील सर्व कॉलनिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील यांनी तर आभार सुधाकर मोरे यांनी मानले.