अग्निवीरांची अग्निपरिक्षा

127

अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजना तिनही सैन्यदलासाठी लागु असुन ज्यांना देशदेवा करायची आहे असे सर्व वय वर्षे साडे सतरा ते एकवीस या गटातील तरुण पात्र आहेत. दिवस भर काम करून, आई वडीलांच्या मेहणतीच्या कष्टाचा पैसा खर्च करून अनेक तरुण सैन्य भरतीची तयारी करत असतात. कोणत्याही सैन्य भरतीची तयारी करायला मेहनत व पौष्टिक आहाराची खुप गरज असते. सैन्य भरतीची तयारी करणारे तरुण वर्गाची आर्थिक परिस्थिती खुप बिकट असते. रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील हे तरुण वर्ग असल्याने हे तरुण मेहनत खुप करू शकतात परंतु पौष्टिक आहार मिळेलच याची खात्री नसते. थोडक्यात काय तर सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना अनेक अडचणी असतात व त्या अडचणीवर मात करून, वेळ प्रसंगी उपाशी पोटी अनेक तरुण मैदानी चाचणीची तयारी करत असतात. थोडी शारीरिक मेहनत घेतली तर भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी मळेल व पगारामधुन कष्टकरी आई वडीलांना आराम मिळेल असे ध्येय उराशी बाळगून तरुण अनवाणी पायाने, कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना अंगातील शर्ट काढून पळतो, आणि ध्येय असते मला सैन्य दलात भरती होऊन आईवडीलांचा सन्मान करायचा म्हणुन अनेक प्रकारची तडजोड करून मेहनत करतो. सरकारने मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी परमनंट सैन्य भरती भरती करण्याऐवजी फक्त चार वर्षासाठी अग्निपथ योजने अंतर्गत भरती करण्याचे नियोजन केले आहे.

म्हणजे बहुतांश तरुणांच्या स्वप्नावर पाणी फिरवून सरकारने तरुणांना अपंगच केले म्हणावे लागेल. चार वर्षे सैन्य दलात काम केल्यानंतर पुढे काय? स्वतः चा जिव धोक्यात घालुन देशाचे संरक्षण करणाऱ्या सैन्यांचा सेवा काल चार वर्षे आणि देशाला अंतर्गत लुटणाऱ्या प्रतिनिधी चा कार्यकाल पाच वर्षे, तरुण असुन देशसेवा करता येणार नाही, आणि हे म्हातारे झाले तरी सत्ता सोडणार नाही थोडक्यात काय तर सरकार होतकरू, मेहनती आणि गरजवंत तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहत असुन तरुणांची हि अग्निपरिक्षाच आहे.
सर्वात सैन्य दलातील सेवेचा कार्यकाल कमी करून सरकारने तरुणांच्या भविष्याविषयी आस्था, आपुलकी, काळजी आणि रोजगाराची हमी नाही असे दिसुन येते. तरीही हजारो तरुणांनी केलेली मेहनत वाया जाऊ नाही, किंवा देशसेवेसाठी चार वर्षे का होईना पण आपण योगदान देऊन देशाच्या सिमेवर देशातील जनतेसाठी उभे राहण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अग्निपथ योजनाचा फायदा घेऊन अग्निवीर बनवण्याच उराशी बाळगून सैन्य भरतीसाठी माणसिक तयारी करून सैन्य भरतीच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि येथुन त्यांची पुन्हा अग्निपरिक्षा सुरू होते. या भरती साठी तरुणांना बोलावले गेले, उद्या देशाच्या सिमेवर जाऊन देशाचे संरक्षण करणाऱ्या तरुणांचा खरचं हा खडतर प्रवास बघुन मनाला कुठे तरी ठेच पोहचली आणि खुप दु:ख वाटले. एक एक रुपया गोळा करून तरुण एकाला जाण्या येण्याचा खर्च जास्त होईल म्हणून दोन पैसे वाचावे म्हणून दहा दहा अकरा अकरा तरुणांनी एकत्र येऊन खाजगी गाड्या करून भरती ठिकाणी आले. आणि तेथे आल्यानंतर खर तर त्यांची अग्निपरिक्षा सुरू झाली. ज्या भागात भरती ठेवण्यात आली त्या भागात त्या तरुणांना सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नाही, स्वच्छता गृहाची सुविधा सुविधा नाही, पिण्यासाठी पाणी घ्यायचे तर विकत घ्यावे लागते. आणि स्वतःच्या गृहाचा वापर करायचा तर चार पाच किलोमीटर पायीपायी चालत जाऊन एखादे स्वतः गृह बघुन पैसे देऊन वापर करावा लागतो.

आणि चार पाच किलोमीटर पुन्हा पायीपायी चालत यावे लागते. भरती परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे निवारा ठिकाण नाही किंवा उपलब्ध करून दिलेले नाही. आणि विषेश म्हणजे भरती ही रात्रीच्या वेळी आहे. यावरून बाहेर गावावरून आलेल्या तरुणांचे काय हाल असतील याची कल्पना येते. तरुणांना पाणी जरी प्यायचे असेल तर दुर जाऊन पाणी प्यावे लागले, जेवन करायचे तरी दुर जावे लागते, खाल्लेल बाहेर टाकण्यासाठी सुद्धा दुर जावे लागते. म्हणजे चालुन चालुन तरुण पुर्ण थकुन जातात. कुठे बसण्यासाठी, आराम करण्यासाठी जागा नसल्याने भरतीची वेळ होईपर्यंत काय करायचे कुठे रहायचे हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा असुन त्यांची त्याच्या वर उत्तर शोधले व आपला नंबर येईपर्यंत आपण कुठे तरी फिरत रहायचे कारण त्या शिवाय दुसरा पर्याय पण नाही. दिवसभर कमी जेवन, कमी पाणी, डोळ्याला व शरीराला थोडाही आराम नाही, संपुर्ण शरिर थकुन गेले असताना रात्री रात्री मात्र अग्निविरांची अग्निपरिक्षा सुरु होते. दिवस भर वणवण फिरल्यानंतर खरचं रात्री मैदानु चाचणी साठी तो किती प्रमाणात तयार असेल. एवढे थकुन, कोणत्याही सुविधा नसताना आणि रात्री बारा बारा वाजता तरुण जर मैदानावर धाऊन आपले स्वप्न पुर्ण करण्याची हिंमत दाखवत असतील तर त्यांना नोकरी ची किती गरज आहे हे यातुन दिसुन येते. दिवसभर फिरून थकलेल्या तरुणांना आरामासाठी जागा नसल्याने मिळेल तशा ठिकाणी तरुण आसरा शोधुन थोडा फार का होईना झोपण्याचा प्रयत्न करतात. मंदिरामध्ये, रोडच्या कडेला, एखाद्या खाजगी लोकांच्या मोकळ्या जागेवर कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना झोपण्याची सोय करून आराम करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसभर फिरून रात्री आपल्या मैदानी चाचणी साठी सज्ज म्हणजे जिव धोक्यात घालुन धावने म्हणजे अग्निपरिक्षाच होय. उद्याचे देशाचे संरक्षण करणाऱ्या अग्निवीरांची भरतीच्या ठिकाणची परिस्थिती बघुन ज्याला भावनिक मन आहे त्यांचे मन हेलकावल्या शिवाय राहणार नाही.

ना पाण्याची सोय, ना राहण्याची सोय, ना खाण्याची सोय, ना सौचालयाची सोय, अशा परिस्थितीमध्ये राहून सुद्धा ज्यावेळी मैदानी चाचणी साठी गेल्यावर तुम्ही नोटरी का करून आणली नाही म्हणून परत पाठवले जात आहे. आणि ज्या तरुणांनी अग्निवीर पदासाठी अर्ज भरले होते त्यांच्या मतानुसार नोटरी ची पूर्वकल्पना च दिली नव्हती. वेळेवर नोटरीची मागणी करून तरुणांनी संधी नाकारली जाते ही एक त्यांच्या सहनशीलतेची अग्निपरिक्षाच आहे. अग्निविरांची ही अवस्था बघुन डोक्यात खरचं खुप वेगवेगळे विचार येतात. आई वडीलांना वाटतं मुलगा सैन्य भरती साठी गेला आहे, एखादा सैन्यात भरती झाल्यावर मुलाचे स्वप्न पुर्ण होऊन घरची आर्थिक परिस्थिती सुधारेल या अपेक्षेवर ते सुद्धा असतात. पण इकडे त्यांना किती कसोटीवर मात करून शारिरीक माणसिक सदृढ रहावे लागते हे फक्त अग्निवीर साठी आलेले तरुणच सांगु शकतात. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात हि बाब आल्यावर त्यांनी आपापल्या परिने प्रयत्न करुन अग्निवीरांसाठी पाणी व नास्ता उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. जर सर्व सामान्य लोक हे करु शकतात तर आपल्याला तालुक्यातील किती तरुण किंवा संपुर्ण जिल्ह्यातील किती तरुण सैन्य भरतीसाठी जात आहेत तेथे त्यांना निवारा केंद्र, पौष्टिक जेवन व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आमदार खासदार का करत नसतील. करोडो रुपयांचा जनतेचा निधी स्वतः कडे वळवून आपल्या मतदार संघातील तरुणांची बाहेर गावी सोय होत असेल तर ही एक अग्निपरिक्षाच आहे.

याच अग्निपरिक्षेमधुन जात असताना औरंगाबाद जिल्ह्यातील एक तरुण शहीद झाला. त्या तरुणाला नमन करून समोर अशा घटना थांबण्यासाठी आणि उद्या जे अग्निवीर म्हणून देशाचे संरक्षण करतील अशा तरुणांना भरतीच्या ठिकाणी अन्न निवारा आणि सौचालय उपलब्ध करून देऊन त्यांना जिव धोक्यात घालून पळण्याची वेळ येणार नसेल तरच ये अग्निपरिक्षेमधुन बाहेर पडतील अशी अपेक्षा करतो, नाहीतर मैदानी परिक्षेपेक्षा मैदाना बाहेरची परिक्षा खुपच खडतर आहे, मनाला हेलकावून टाकणारी आहे. हिच अग्निविरांची अग्निपरिक्षा थांबली पाहिजे.

✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(मो:-९१३०९७९३००)