दुदैवी! दोन कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलासह मृत्यू

38

🔸सिरसाळा-परळी रोडवरील दुदैवी घटना

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

सिरसाळा(दि.30ऑगस्ट):- परळी रोडवर आज सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात दिंद्रूड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे यांच्यासह त्यांच्या ९ वर्षाचा मुलगा यश याचा जागीच मृत्यू झाला. यात गाडी चालक आणि डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. शिंदे मुलाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना हा भीषण अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिंद्रूड येथील पोलीस कर्मचारी कोमल शिंदे या आजारी मुलास उपचारासाठी परळीस कारमध्ये (एम एच १४ ,जिवाय ९११३ ) घेऊन जात होत्या. कार पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे चालवत होता. दरम्यान, परळीहून दुसरीकार ( एम एच ४७ ,० ५३२६ ) समोरून येत होती. दोन्ही कारची सिरसाळा जवळ समोरासमोर धडक झाली. यात पोलीस कर्मचारी शिंदे आणि त्यांच्या मुलगा यश याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक लटपटे आणि दुसऱ्या कारमधील एकजण गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या कारमधील जखमी व्यक्ती वैद्यकीय अधिकारी डाॅ.इलियास असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीस आणि नागरिकांनी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे.