संत सावतामाळी युवक संघाने शिक्षक दिनी केला शिक्षकांचा सन्मान !

31

🔹सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांना केले अभिवादन !……

🔸शैक्षणिक क्रांतीचे जनक म्हणजेच फुले दांपत्य होय. – मा. कैलास वाघ सर

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.6सप्टेंबर):-अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य धरणगाव चा वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले व आई सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समाजाचे शिक्षक गुरूजन जेष्ठ शिक्षक प.रा.विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास वाघ सर, महात्मा फुले हायस्कूलचे व्ही.टी.माळी सर, हेमंत माळी सर,पी.डी.पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

पी.डी.पाटील, व्ही.टी.माळी व कैलास वाघ सर यांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांचा जीवन संघर्ष उलगडला. तात्यासाहेब व माईंचे जीवन चरित्र म्हणजे ऊर्जा स्रोत !.. शैक्षणिक क्रांतीचे जनक म्हणजेच फुले दांपत्य होय. या महामानवांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करूया असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

संघटनेचे विभागीय संघटक विनायक महाजन,जिल्हा संपर्कप्रमुख निलेश माळी, तालुका अध्यक्ष दिनेश महाजन,शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री कैलास वाघ सर, शेतकरी आघाडी अध्यक्ष गजानन महाजन, तालुका उपाध्यक्ष गौरव महाजन, नुतन सोसायटी चे संचालक श्री राजेन्द्र महाजन,तिरंगा अकॅडमी चे संचालक समाधान महाजन सर, सामाजिक कार्यकर्ते नितेश भाऊ महाजन, निवृत्ती माळी, भगवान माळी, सागर माळी, समाधान महाजन, राहुल महाजन, निलेश महाजन, राजुमाळी, बालाजी माळी, योगेश माळी, सचिन माळी, ज्ञानेशवर माळी, तसेच समाजातील तरुण समाजबांधव उपस्थित होते.आजचा कार्यक्रमाचे नियोजन शहर अध्यक्ष रवींद्र माळी व त्यांच्या पदाधिकारी यांनी केले व सुत्रसंचलन समाधान माळी सर यांनी तर आभार तालुका अध्यक्ष दिनेश महाजन यांनी मानले.