ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला – विजयसिंह पंडित

35

🔹दैठण पाणीपुरवठा योजनेचा भव्य शुभारंभ

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.13सप्टेंबर):- विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचे मुलभूत प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. यापुढील काळातही गाव, वाडी वस्ती आणि तांड्यावर मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील. येणाऱ्या काळात जि.प. आणि पं.स.च्या निवडणुका आहेत, त्यासाठी सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे लोक मताची ताकद उभी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. तालुक्यातील दैठण येथील पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

जलजिवन मिशन अंतर्गत एक कोटी पंधरा लक्ष रुपये किंमतीच्या दैठण पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते संभाजी अण्णा पंडित, सरपंच प्रतापराव पंडित, नगरसेवक श्याम येवले, सुभाष महाराज नागरे, गजानन काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, पाणी पुरवठा योजनेचे काम चांगल्या दर्जाचे केले जाईल. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. गावातील प्रत्येक काम प्राधान्याने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. येणा-या काळातही उर्वरित प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला लिंबाजीराव खोटे, शिवाजी गोडबोले, कचरु येवले, विक्रम नलभे, रावसाहेब काळे, गोकुळ चोरमले, अशोक पंडित, चंद्रकांत पंडित,अजय पंडित, अतूल पंडित, नितीन पंडित, बप्पासाहेब पंडित, अशोक पिंगळे, अजित पंडित, निलेश पंडित, रमेश जामकर, गजानन खताळ यांच्यासह दैठण आणि परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.