मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेंडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा

🔸अनिल पाटील सोलापूर ते मुंबई पायी चालत आंदोलन

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.14सप्टेंबर):-मोहोळ तहसीलदार प्रशांत बेडसे हे सर्व सामान्य लोकांना , अपमानास्पद वागणूक देतात. सर्व सामान्य लोकांची कामे लवकरात लवकर होत नाहीत व हे तहसीलदार अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालतात मोहोळ तालुक्यात ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वारंवार निवेदन देऊन पण कारवाई केली नाही.

त्यामुळे प्रहारचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुकार्याध्यक्ष अनिल पाटील सोलापूर येथील रूपाभवानी मातेचं दर्शन घेऊन मंदिरापासून ते मुंबई पर्यंत पायी चालत लोटांगण घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निघाले, यावेळी शहर कार्याध्यक्ष खालीद भाई मणियार, तालुका प्रमुख वैभव जावळे संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर, गणेश बळवंतराव, सोमनाथ नवले, युवक उपाध्यक्ष भुतासिद्ध म्हमाणे, प्रसिद्धी प्रमुख विशाल मासाळ आदीसह उपस्थित होते

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED