नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस ; गोदावरी ला चौथ्यानंदा पुर, नदीकाठच्या नागरिकांना प्रशाशनचा सर्तकतेचा इशारा

32

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.17सप्टेंबर):-जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ९ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे.

तर ८ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील १६ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदीच्या काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणात नव्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यातील ९ धरणे पूर्ण क्षमतेने भरली, तर ८ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १६ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दारणा धरणातून ५ हजार ७०८, नांदूरमध्यमेश्वरमधून १४ हजार ४२० क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे . गंगापूर धरणातून १५०० क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य धरणांमधूनही कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २४ लहान, मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सध्या ९० टक्के पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, नाशिकच्या त्रंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून ४ हजार क्युसेक वेगानं पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील इतर धरणांची स्थिती
जिल्ह्यातील अनेक मध्यम धरणे शंभर टक्के भरली असून धरणांमधील एकूण सरासरी जलसाठा ९२ टक्क्यांवर पोहचला आहे, तर गंगापूर धरण ९९टक्के भरल्यामुळे मंगळवार दुपारपासून विसर्ग सुरु करण्यात आला. तर गुरू वार, शुक्रवार, शनिवारी सकाळी तीन हजार क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे रामकुंडासह परिसरात पाणीच पाणी झाले आहे.

जिल्ह्यातील विविध धरणसमुहांचा आढावा घेतला असता, मंगळवार अखेर गंगापूर धरण क्षमतेच्या ९९ टक्के भरले आहे. त्यामुळे ३६१८ क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. इतर धरणांपैकी काश्यपी आणि गौतमी, गोदावरी दोन्ही धरणे ९९ टक्के भरले असून त्यातून विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरण समुहातील धरणांचा जलसाठा ९९ टक्के पोहचला आहे.

पालखेड धरण समुहापैकी पालखेड धरण –पुर्ण १०० टक्के भरले असून करंजवण – ९२ टक्के, वाघाड- १०० टक्के भरले आहे. ओझरखेड धरण शंभर टक्के, पुणेगाव प्रकल्प – ९०टक्के, तीसगाव धरण – १०० टक्के भरले असून, पालखेड धरणसमुहाचा जलसाठादेखील ९८ टक्क्यांवर पोहचला आहे.

दारणा धरण समुहापैकी दारणा ९६ टक्के, भावली १००, मुकणे- ९८ वालदेवी -100, कडवा- ८९, भोजापूर- 100 टक्के भरले असून गिरणा खोरे धरण समुहात चणकापूर- ७३ हरणबारी- 100, केळझर-100, गिरणा धरण-९२ टक्के भरले असून गिरणा धरणातून दोनच दिवसापुर्वी मोठा विसर्ग सुरु झाला आहे. तसेच पुनद प्रकल्प -७६ , माणिकपुंज धरणात-७२ टक्के पाणीसाठा आहे.

एकुणच जिल्ह्यातील एकुणच धरणे भरली असून नाशिक जिल्हा परीसरातील तालुक्यातील धरणे पुर्ण क्षमतेने जलसाठा झाला आहे. अन्य धरणातून वेळोवेळी गरजेनुसार जादा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून सर्वाधिक ३९१७२क्युसेक पाणी गोदावरीत सोडण्यात आले आहे.