गेवराई येथे मुकबधिर व मतिमंद निवासी विदयालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

31

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.17सप्टेंबर):-रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाडुंळा संचलित कै.भगवानराव ढोबळे मुकबधिर निवासी विदयालय व मतिमंद निवासी विदयालय गेवराई येथे १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करुन बॅंक ऑफ इंडिया, गेवराई शाखेचे शाखा व्यवस्थापक भागवत यादव, सामाजिक कार्यकर्ते सावळेराम दादा पौळ, ज्ञानेश्वर मोताळे यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.