✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.23सप्टेंबर):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृरदृष्टी धोरणांमुळे देशातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. बळीराजाला सशक्त करीत भारतला समृद्ध करण्यासाठी प्रंतप्रधानांच्या नेतृत्वात केंद्र सरकार कटिबद्ध असून वेळोवेळी त्याची प्रचिती येते, असे प्रतिपादन भाजप नेते आनंद रेखी यांनी शुक्रवारी (दि-२३ सप्टेंबर) केले.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सारखी थेट रक्कम देणारी पहिलीच देशव्यापी योजना राबवून शेतकऱ्यांना ‘ऊर्जादाता’ बनवण्याचे कार्य पंतप्रधानांकडून केले जात आहे.या योजनेअंतर्गत आतापर्यंत ११.७८ कोटी लाभार्थ्यांना वर्षांकाठी ६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जात आहे.
शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून गत सहा वर्षांमध्ये १०.२५ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना १.२ लाख कोटींची मदत केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.देशातील तब्बल ३७.५२ कोटी शेतकऱ्यांनी योजनेत नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे या योजनेतील ८०% लाभार्थी हे छोटे तसेच सीमांत शेतकरी असल्याचे रेखी म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी हितकारक धोरणांमुळे विमा योजनेसाठीच्या अर्जदारांच्या नोंदणीत ३.७० कोटींवरून ८.२ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. विम्यांतर्गत हेक्टरी सरासरी रक्कम १८ हजारांवरून ४५ हजारांपनर्यंत वाढवण्यात आल्याचे देखील रेखी म्हणाले.
१ हजार मंड्यांचे एकात्मीकरण करीत १.८२ लाख कोटींचा व्यापार करण्यात आला आहे. १.७२ कोटी शेतकरी या ‘ई-नाम’ वर नोंदणीकृत असल्याने त्यांना त्यांचा शेतमालाची थेट विक्री करता येत असल्याची बाब रेखी यांनी निर्दशनास आणून दिली.आत्मनिर्भर भारत निर्मितीत शेतकऱ्यांची मोठी भूमिका आहे. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना सशक्त करीत ग्रामीण भागाला उभारी दिली आहे.ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यामुळे मोठे बळ मिळाले आहे.सशक्त भारत निर्मितीच्या दिशेने मोदींच्या या धोरणाचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे आनंद रेखी म्हणाले.