२५हजाराला बैल कुठे मिळतो मायबाप सरकार?-शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या प्रश्न

80

🔸पशुपालक संताप -लंपीत दगावलेल्या गाय म्हैससाठी ३०तर वासरांसाठी १६हजार मिळणार

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमुर(दि.1ऑक्टोबर):-जनावरांना उद्भवलेल्या विषाणूजन्य लंम्पी चर्म रोग प्रादुर्भाव मुळे शेतकरी/पशुपालक याच्या मृत पावलेल्या पशुधनासाठी कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने अर्थसहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे.यात बैलासाठी २५हजार तर गाय, म्हैस साठी ३०हजार रुपये देण्यात येणार आहेत यानंतर २५ हजारला बैल कुठे मिळतो मायबाप सरकार?असा सवाल शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे व शेतकरी यांनी उपस्थित केला जात असून सदर मदत तुटपुंजी असल्याची भावना शेतकरी व विनोद उमरे ची आहे‌.

लपी चर्म रोग सर्गाचे प्रादुर्भाव मुळे ज्या शेतकरी / पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू पावल्यास मदत घोषित केली आहे.परंतु ही मदत अत्यंत कमी असल्याचे प्रहार सेवक विनोद उमरे व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या बाजारात लाखांच्या घरात बैलाची किंमत असून म्हैस आणि गायकही ५० हजारांच्या वरच विकत घ्यावी लागत आहे.तुटपुंजी मदत न करता मदत वाढवावी अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे शेतकऱ्यांनी केली आहे…