माता सुरक्षित तर घर सुरक्षित जागर आरोग्याचा सन्मान महिलांचा कार्यक्रम संपन्न

31

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर(४आॕक्टोंबर)प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव उपकेंद्र दावडी येथे नवरात्र उत्सव -२०२२ सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये किशोरवयीन मुली, नवविवाहित महिला, स्तनदा माता, वयस्करमहिला,यांच्या आरोग्यांची तपासणी करण्यात आली व लॅब तपासणी केली यामध्ये वजन उंची, बी पी, शुगर, थायराइड, कॅल्शियम, लिव्हर फंक्शन टेस्ट करण्यात आली.

या कार्यक्रमाला दावडी गावच्या विद्यमान सरपंच राणीताई डुंबरे, उपसरपंच अनिल नेटके, मा जिल्हा परिषद सदस्य मा.सौ.वंदनाताई सातपुते, माजी सरपंच आबा घारे,महिला सदस्य पुष्पाताई होरे, पर्यवेक्षक सणस मॅडम, अंगणवाडी सेविका, प्राथमिक उपकेंद्राचे सर्व स्टाफ, व सुपरवायझर रोहिणी आहेर, प्रवीण यादव,धनंजय लिमजे,तसेच दावडी उपकेंद्राच्या माननीय सौ स्नेहा ताई कोठुंरवार,आरोग्य सेवक राजेंद्र पंडित कोळी, आरोग्य सेवक श्री संपत आनंद तांबे उपकेंद्र वरुडे, तसेच या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक उपकेंद्र दावडी सर्व आशाताई तसेच बीएफ तसेच अर्धवेळ परिचर सफाई कर्मचारी यांनी कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडले.माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वंदनाताई सातपुते,व डॉक्टर सौ.स्नेहाताई कोठुंरवार यांनी महिलांना बालसंगोपन व आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली.

तसेच माजी सरपंच आबासाहेब घारे यांनी सांगितले की या ठिकाणी कायम स्वरूपी निवासी डॉक्टर व पूर्णवेळ नर्सची जागा रिक्त आहेत त्या लवकरात लवकर शासनाने भराव्यात त्यामुळे येथील ग्रामस्थांना चांगली सेवा देण्यात येईल.तसेय या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे.केंद्र शासन व राज्य शासन यांचे ९ कोटी व जिल्हा परिषद यांच्यातर्फे १कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले असून त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी त्याचे काम चालू नाही. तरी ते काम लवकर लवकर सुरू करण्यात यावे असे सांगितले.या कार्यक्रमाला दावडी गावचे आजी-माजी पदाधिकारी महीला भगिनीं,आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.