प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्यामुळे पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान

53

✒️पिंपरी चिंचवड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पिंपरी चिंचवड(दि.4ऑक्टोबर):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्यामुळे पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी बालाजी नगर, भोसरी, पुणे येथे मातंग समाजाचा पहिला दसरा मेळावा पार पडला. हा मेळावा मातंग चेतना परिषद, पिंपरी चिंचवड व लहुजी टायगर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता

यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मातंग चेतना परिषद, पिंपरी चिंचवड व लहुजी टायगर युवा मंचच्या वतीने संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष रणसिंग, महीला शहराध्यक्षा सौ. मंदा बनसोडे, सदस्य हुसेन खान, अली ईराणी आदी पदाधिकाऱ्यांचा अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु संत दादा महाराज रामदासी तर प्रमुख अतिथी अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांची उपस्थिती होती.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या अर्ध पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध लोक कलावंत आसाराम कसबे यांनी लहू वंदना सादर केली.या मेळाव्यासाठी वक्ते म्हणून औरंगाबादचे अंबादास सकट, पुणेचे धनंजय भिसे, आणि सोलापूरचे प्रा. सुभाष खिलारे यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे निवेदन लहुकन्या साक्षी कांबळे तर आभार सचिन वाघमारे यांनी मानले.