उमरखेड येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि सम्राट अशोक विजयादशमी उत्सव सोहळा साजरा

29

🔹असंख्या बौद्ध बांधवांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 6 ऑक्टोंबर):;शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि सम्राट अशोक विजयादशमी उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.शहरामधील सम्यक बुद्ध विहार डॉ. बाबसाहेब आंबेडकर वार्ड येथून 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भदंत कीर्ती बोधी,या कार्यक्रमाच्या अध्यक्षा हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका), शंकरराव दिवेकर (माजी सैनिक) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रमामाता महिला मंडळाच्या वतीने ध्वज गीत सादर करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.तसेच उमरखेड तालुक्यात प्रसिद्ध असलेले सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर यांचा निर्भिड, निस्वार्थी पत्रकार म्हणून व समाजकार्याबद्दल धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तर सायंकाळी 5 वा. भव्य मिरवणुक काढून उत्सव सोहळा साजरा करण्यात आली.या मिरवणुकीमध्ये असंख्या बौद्ध बांधवांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.या कार्यक्रमाचे आयोजन 66 वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्सव समिती च्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष योगेश दिवेकर,कोषाध्यक्ष आकाश श्रवले, सचिव कुमार केंद्रेकर,अमोल दिवेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर यांनी केले तर सहकार्य म्हणून शांताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, यशोदाबाई दिवेकर, तुषार पाईकराव,मनोज इंगोले, संतोष इंगोले, बुद्धभूषण इंगोले, जयपाल दिवेकर,रमामाता महिला मंडळ, शांतीदुत समिती,भिम टायगर सेना इत्यादींनी केले.

यावेळी या मिरवणुकीत अनेक बौद्ध उपासक,उपसिका,तरुण मंडळी, बालक तथा बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.