महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाची खेड तालुका कार्यकारणी जाहीर

13

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर(दि.६आॕक्टोंबर):-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. खेड तालुका पत्रकार संघाच्या कार्यकर्त्यांची आज बंडूभाऊ यांच्या नवीन हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकारी यांना अध्यक्ष सम्राट राऊत, उपाध्यक्ष विश्वनाथ केसवड, जेष्ठ पत्रकार कल्पेशभाई भोई, अशिष ढगे पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी कार्याध्यक्ष अनिकेत मुरलीधर गोरे, सचिव अॕडव्होकेट प्रीतम शिंदे, सहसचिव दत्ता घुले, सहसचिव आरिफ शेख, कायदेशीर सल्लागार अॕडव्होकेट रवींद्र कुटे, कायदेशीर सल्लागार महिला अॕडव्होकेट रुपाली परदेशी,प्रसिद्धी प्रमुख कुमारी अक्षता कान्हुकर, संघटक मनोहर गोरगल्ले, संघटक प्रशांत भामरे, संकटक लहु लांडे, संघटक सुनील बटवाल, संपर्कप्रमुख प्रशांत नाईकनवरे, सह संपर्कप्रमुख दुर्योधन कांबळे, यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार संपादक काळुराम घोडके, भीमाशंकर टाकळकर, प्रशांत नाईकनवरे, अरिफ शेख, बंडूभाऊ भागवत, मनोहर गोरगले, जेष्ठ पत्रकार कल्पेश भाई, संघटनेचे सचिव अॕडव्होकेट प्रीतम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यांनी पत्रकार त्याच्याबद्दल व डिजिटल मीडियाच्या बाबत सविस्तर माहिती दिली व सर्व पत्रकार एकत्र येऊन तालुक्यात पत्रकार भवन बांधण्यात येईल असे अध्यक्ष माननीय सम्राट राऊत यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी दुर्योधन कांबळे, लहू लांडे, कुणाल शिंदे, सचिन लाड, धनंजय पोखरकर, प्रशांत भामरे, मनोहर गोरगल्ले, सुनील बटवाल, अरिफ शेख, भानुदास देशमुख, नितीन सैद,चंद्रकांत भालेकर, राजेश देवडकर, महेश शिंगारे, तानाजी पिंगळे, बबनराव खेसे, एस के घोडके, मंदार कामठे, गणेश देशपांडे, अर्चना हजारे, व इतर पत्रकार उपस्थित होते