येरळेचा अमृत यात्रेत सामावेश; १२५ किमीचे पुनरुज्जीवन होणार-प्रकाश जाधव यांची माहिती

67

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.8ऑक्टोबर):-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘नदी अमृत यात्रा’ महोत्सव साजरा होत आहे. याद्वारे राज्यभरातील ७५ नद्यांना अमृत वाहिनी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील उगमस्थान असलेल्या येरळा नदीचा समावेश केला गेल्याची महिती जलयोद्धा प्रकाश जाधव यांनी दिली.

येरळा नदीचे उगमस्थान असलेल्या उत्तर खटावमधील मांजरवाडी येथील म्हस्कोबा डोंगरापासून ते सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ पर्यंतच्या १२५ किलोमीटरच्या अंतरावरील नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

याकामी प्रकाश जाधव यांची समन्वयक पदी निवड केली आहे. यात्रेच्या पहिल्य टप्प्यात येरळा नदीची सध्याची प्रदूषण स्थिती, वाळूउपसा, अतिक्रमणे, सोडलं जाणारे सांडपाणी, पूल व अन्य बांधका‍ याच्या नोंदी घेतल्या जातील. नदीचे मूळ जलस्रोत, पुनरुज्जीवनासाठी राबवत येणारे उपक्रम यांचे आराखडे तयार केल जातील. तसेच नदीच्या खोऱ्यातील सर्व गावांत शासन स्तरावर माथा पायथा आराखडा तयार केला जाणा असून या ठिकाणी जलसंधारणाच कामे केली जाणार आहेत. स्थानिकh गावकऱ्यांना सहभाग केला जाईल. आजवर पुनरुज्जीवीत केलेल्य नद्यांना मॉडेल स्वरुपात समोर ठेवल जाणार असल्याची माहिती प्रकाश जाधव यांनी दिली.