दानशूर आदर्श व्यक्तीमत्व – संजयकुमार सुर्यवंशी..

34

पुत्र व्हावा ऐसा बंडा,त्याचा कर्तृत्वाचा झेंडा.असा कर्तृत्ववान पुत्र म्हणजे आद. संजयकुमार सुर्यवंशी साहेब.आई वडील सुशिक्षित असल्यामुळे लहानपणापासूनचं त्यांना चांगले संस्कार,मार्गदर्शन लाभले.त्यातूनचं ते घडत गेले.पन्नासाव्या वर्षी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून कार्यकारी अभियंता म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेऊन अन् ते हॉटेल व्यवसायात उतरले. हॉटेल व्यवसायात त्यांची वाटचाल दमदार असून भविष्यात हॉटेल व्यवसायात निश्चितचं ते यशाचे शिखर पादाक्रांत करतील यात शंका नाही. गेल्या वर्षी त्यांच्या आईला अर्धांगवायू झाला तेव्हा त्यांनी सर्व वैद्यकीय यंत्रणा उभ्या करुन आईच्या तब्बेतीत सुधारणा घडवून आणली, काही महिन्यातचं त्या पुर्ववत होतील. डॉक्टर, सिस्टर यांच्या देखरेखीखाली आई आजही एका स्पेशल रुममध्ये असून,महाराष्ट्रातील अन् परदेशातील सर्व नातेवाईकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी जोडून ठेवले आहे. घरात अन् नातेवाईक यांच्यात ‘कुमार’ ह्या टोपन नावानेचं ते ओळखले जातात. ते कुटुंबवत्सल असून,आई वडिलांवर त्यांचे असलेले निस्सीम प्रेम त्यांच्या बोलण्यातून अन् कृतीतून दिसून येते.

उजव्या हाताने दान केलेलं,डाव्या हातालाही कळू न देणारे,पडद्यामागील दानशूर व्यक्तीमत्व,समाजसेवक,सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुर्यवंशी साहेबांची ओळख आहे. गेल्या काही वर्षात सुर्यवंशी साहेबांचा जो सहवास लाभला त्यातून त्यांचे ग्रेट उदारमतवादी, प्रेमळ,आदर्श,मार्गदर्शक,प्रेरणादायी सेवाभावी व्यक्तीमत्व दिसून आले. एखादा कार्यक्रम असो, नैसर्गिक घटना असो,एखादी वैयक्तीक घटना असो किंवा इतर काही प्रसंग.. साहेबांनी प्रत्येक वेळी सर्वांनाचं सढळ हस्ते मदत करुन,सुख दुःखात ते नेहमीचं सहभागी झाले आहेत. कोकणरत्नभूमी सामाजिक संघटनेच्यावतीने आम्ही अनेक उपक्रम राबविले, त्यावेळी त्यांनी आम्हांला अनेक वेळा मदत केली. पण,सढळ हस्ते आर्थिक मदत मिळतेय म्हणून आम्ही सुध्दा साहेबांकडून कधीचं वायफळ पैसा उकळण्याचा प्रयत्न केला नाही,तर आवश्यक तेवढीचं मदत त्यांच्याकडून घेतली आहे.साहेब नेहमीचं म्हणायचे,तुम्ही चांगले उपक्रम राबवित आहात,काही तरी चांगले करत आहात,त्यामुळे काही मदत लागली तर निसंकोचपणे कधीही माझ्याकडे मागणी कर.मी अनेक वेळा साहेबांना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी आग्रहाने निमंत्रीत केले पण,त्यांनी एकाही कार्यक्रमाला कधीचं उपस्थिती न दर्शविता नेहमीचं प्रसिध्दीपासून दूर राहत सहकार्य अन् मार्गदर्शन करीतचं राहिले आहेत.

कोरोना काळात काही होतकरु कुटुंबांना तसेच पुरग्रस्तांनाही त्यांनी लाखो रुपयांची सढळ हस्ते आर्थिक अन् वस्तू स्वरुपात मदत केली. एवढेचं नाही तर, चिंचवली स्मशानभूमी प्रकरणी मध्यंतरी काही लोकांनी मला बदनामीच्या माध्यमातून मानसिक त्रास देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही मान्यवर मंडळींनी मला अनमोल सल्ला देऊन सावरले त्यापैकी आद.सुर्यवंशी साहेब एक होते. सरांनी प्रत्येक वेळी मला मार्गदर्शन केले आहे अन् आजही करत आहेत.

संजयकुमार सुर्यवंशी साहेब यांच्या स्वभावातील गोडीने अन् जिभेवरील माधुर्याने, प्रामाणिकपणा,सौजन्यशीलपणा,अडचणीत धावून जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली.त्यांचा मित्र परिवार फार मोठा आहे.आपल्या सोबत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी कधी लहान असल्याची जाणीव होऊ दिली नाही.त्यांनी नेहमीचं सर्वांना सन्मानाची,आदराची वागणूक दिली, सर्वांना सहकार्य करुन सोबत घेऊन जाण्याचा नेहमीचं प्रयत्न केला. म्हणूनचं त्यांच्याबद्दल सर्वांनाचं आत्मियता,जिव्हाळा वाटतो.सामाजिक क्षेत्रात त्यांचे फार मोठ योगदान असूनही,ते प्रसिद्धीपासून नेहमीचं दूर राहतात,पडद्यामागे राहतात.

आद.संजयकुमार सुर्यवंशी साहेब यांनी आपल्या नांदेड जिल्ह्यात अन् ते राहत असलेल्या बदलापूर,अंबरनाथ तसेच इतर कोणत्याही ठिकाणी महापुरुषांची संयुक्त जयंती असो,बुध्द विहार,स्मारक किंवा इतर कोणताही उपक्रम असो,ते आयोजकांच्या सोबत सर्वशक्तीनिशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांनी सामाजिक बांधिलकी अन् समाज भावनेबरोबरचं मंगल मैत्री भावनाही कायम जपली आहे. आंबेडकरी चळवळीचे युवा नेतृत्व आद. प्रविण गोसावी तर त्यांच्या निस्वार्थी,आदर्श व्यक्तीमत्वाचं नेहमीचं कौतुक करत असतात.खरचं, आद. संजयकुमार सुर्यवंशी साहेब म्हणजे चळवळीला लाभलेलं एक आधारस्तंभ,आधारवडचं आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांनाचं नेहमीचं सार्थ अभिमान अन् प्रेम भावना आहे. अशा दानशूर,प्रेमळ व्यक्तीमत्त्वाचे भावी जीवन सुख समृद्धीचे,भरभराटीचे,आनंदीमय,यशस्वी, सुरक्षित,इच्छित मनोकामनापुर्तीचे अन् निरोगी दिर्घायुष्यमय जावो ह्याचं मंगलमय अनेकोत्तम सदिच्छा !!

✒️मिलिंद कांबळे(चिंचवलकर,विरार,जिल्हा पालघर)मो:-9892485349