12 ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभाग अतर्गत जिल्हा परिषदचे 5 सर्वगांचे पेपर तात्काळ घेण्यासाठी मोर्चा

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.11ऑक्टोबर):- 2019 मध्ये काढलेल्या ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अंतर्गत 5 संवर्गातील परिक्षा 2019 पासुन आजपर्यंत विविध कारणे देऊन पुढे ढकलत आहेत. अलिकडेच काही वर्तमान पत्रामध्ये ही पदभरती रद्द करून नव्याने पदभरती घेण्यात येणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. जर असे झाल्यास दि. 29 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने एक नवीन सेवा प्रवेश नियम अधिसूचना जाहीर केली. ज्यामध्ये आरोग्य या पदाची शैक्षणिक पात्रता ही बदलवुन टाकण्यात आली आहे.

यामुळे जर परिक्षा रद्द झाल्या तर ही नवीन सेवा प्रवेश नियम लागू होणार आणि 2019 मध्ये निघालेली जाहीरात ही आरोग्य सेवक या पदाकरीता 10 वी पास होती पण ते आता 12 पास (विज्ञान शाखा) असे होणार. असे झाल्यास 2019 मध्ये अर्ज भरलेले सर्व उमेदवार हे अपात्र ठरतील. इतकेच नाही तर बराचश्या उमेदवारांची वयोमर्यादा देखील पार होवुन जातील. या सर्वांवर हे अन्याय कारक ठरणार आहे. या परिक्षा ह्या 2019 च्या जाहीराती प्रमाणेच घेण्यात याव्या अन्यथा नवीन जाहीरात घेऊन जर परिक्षा घेत असतील तर 2019 च्या जाहीरातीप्रमाणेच पात्रता ठेवुन परिक्षा घेण्यात यावे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 29/09/2021 रोजी काढलेली नवीन सेवा प्रवेश नियम अधिसुचना ही या हंगामी क्षेत्र कर्मचारी / फवारणी कर्मचा-यांवर अन्यायकारक आहे. सन 1995 पासून आरोग्य विभागातील मलेरीया विभागात वर्षानुवर्षे सेवा देत आहोत. दिलेल्या मानधानावर राबत होते. याचा फलीत म्हणुन आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पदाकरीता 50% राखीव कोटा देण्यात आला होता परंतु या नवीन अधिसुचनेनुसार हा 50% राखीव कोटा पुर्णपणे संपविण्यात आला आहे. हे नवीन सेवाप्रवेश नियम लागु करण्यापुर्वी कुठल्याही संघटनेशी चर्चा केली नाही. आमचा कुठलाही विचार केला नाही. यामुळे इतकी वर्ष राज्याला आरोग्य सेवा देणारे हंगामी कर्मचारी पुर्णतः निराश झाले आहोत.

हे नवीन सेवाप्रवेश नियम तात्काळ रद्द करण्यात यावा अशा दोन मागण्या घेवुन दि. 12/10/2022 रोजी इंदिरा गांधी चौक गडचिरोली ते जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली पर्यंत पायी मोर्चा काढुन जिल्हाधिकारी यांना निवेदन सोपविणार असल्याची माहिती ज्ञानदीप गलबले – अध्यक्ष, विलास ढोरे- उपाध्यक्ष, सुनिल तागडे- सल्लागार, अमित कुकुडकर -सचिव , प्रशिक म्हशाखेत्री- कोशाध्यक्ष, चेतन जेंगठे- तालुकाध्यक्ष गडचिरोली, सोपान म्हशाखेत्री-प्रशिध्द प्रमुख महाराष्ट्र हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.