महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे जंतनाशक दिन उत्साहात साजरा !..

33

🔸ग्रामीण रुग्णालय धरणगाव कडून विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप !….

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.12ऑक्टोबर):- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्या तर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले हायस्कूल शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेवक रियाज देशमुख, समुपदेशक ( RKSK ) गणेश कुंभार, आरोग्य सेविका दीपा मोरावकर उपस्थित होते.

आरोग्य सेवक रियाज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्य विषयी विस्तृत अशी माहिती सांगून मार्गदर्शन केले. गणेश कुंभार यांनी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एम.बी.मोरे, एस. व्ही.आढावे, पी.डी.पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील यांनी तर आभार एच.डी. माळी यांनी मानले.