कुरआनला समर्पित व्हा या राष्ट्रव्यापी आभियानाची सुरवात

15

🔸जमाअत ए इस्लामी हिंद चे अभियान

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.15ऑक्टोंबर):-जमाअत ए इस्लामी हिन्द तर्फे कुरआन ला रुजू व्हा (रुजूअ इलल कुरआन) कुरआन ला समर्पित व्हा नावाने राष्ट्रीय अभियान 14 ते 23 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.

कुरआन अवतरणाचा उद्देश त्याच्या आदेशाचे पालन करणे, त्याव्दारे अल्लाह- ईश्वराची मर्जी संपादन करून ज्या कामाचा आदेश देण्यात आला त्याची माहीती घेउन आचरणात आणणे, त्याच्या नाराजी व प्रकोपाची कारणे शोधून त्यापासून स्वतःव समाजला परावृत्त करणे होय.परंतु मुसलमान कुरआन पासून दुर राहल्याचे गंभीर नुकसान मुसलमानांना पोहचले आहे.

यामुळे त्याच्यात विभिन्न मार्गभ्रष्टता, अशिक्षित मुस्लीममध्ये अंध विश्वास पसरला, शिक्षित मुस्लीम पाश्चिमात्य विचारधारेने प्रभावित झाले. त्यांना क्षध्देचा विसर पडला. यामुळे इस्लाममध्ये नसलेल्या बाबी इस्लामी शिकवण म्हणून रुजु झाल्या यामुळेच त्यांना आपल्या जवाबदाऱ्यांचा विसर पडला. म्हणुन प्रत्येक मुस्लीमाचा सबंध कुरआनशी मजबुत व्हावा. त्यांनी कुरआन ला समजुन त्याचे अध्यन करून आचरणात आणावे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

हया अभियानाचा सुरवात (लाऊंचिंग ) कार्यक्रम दि .13 रोजी जामेतुल मोहसीनात शाळेत संपन्न झाला.

यात प्रास्ताविक स्थानिक अध्यक्ष काझी जहीरोद्दीन यांनी केले. अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यकर्माची माहीती अभियानसंयोजक अ .रऊफ नदवी यांनी दिली ते म्हणाले, की शहरात हस्त पत्रके,पुस्तकें, कॉर्नर मीटिंग जाहिर सभा द्वारे कुरआन विषयी जनसामान्यात जागृती करण्यात येणार आहे.
सुत्रसंचलन मो. अबुजर यांनी केले.

अभियाना कार्यक्रमात नागरिकांसह संघटनेचे कार्यकर्त आवर्जुन उपस्थीत होते.