जि.प.शाळा थोरगव्हाण येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा !…..

22

🔸मुलांनी पुस्तक वाचून , माहिती सांगून माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना केले अभिवादन !…..

✒️यावल प्रतिनिधी(निलेश पाटील सर)

यावल(दि.15ऑक्टोबर):- जि.प. शाळा थोरगव्हाण येथे वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश धर्मराज पाटील सर यांनी केले. त्यांनी सर्व विद्यार्थाना वाचनांचे महत्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे होते. त्यांनी “वाचाल तर वाचाल ” या संदर्भात विद्यार्थ्याना प्रेरीत केले. प्रमुख अतिथी म्हणुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव होते. त्यांनी विद्यार्थ्याना माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम याची विद्यार्थ्याना करून दिली. मान्यवरांच्या हस्ते मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आज रोजी शालेय विद्यार्थ्यानी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम याच्या जयंती दिनानिमित्त शाळेत , निंबध स्पर्धा , महापुरुषाच्या गोष्टीचे वाचन – कथन केले . वकृत्व स्पर्धेत भाग घेतला.याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष संदिप सोनवने व सर्व सदस्य , सहशिक्षक एकनाथ सावकारे , निलेश धर्मराज पाटील निलेश माधवराव पाटील उपस्थित होते.