अखिल भाविक वारकरी मंडळाचा “वारकरी मेळावा” सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न

20

🔹सोशल मीडिया उत्तर सोलापूर तालुकाप्रमुखपदी विशाल सपकाळ यांची निवड

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.17ऑक्टोबर):-काल सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळाचा वारकरी मेळावा मोठ्या उत्साहाने हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित संपन्न झाला.यावेळी प्रथमता सर्व मान्यवरांच्या हस्ते विठुरायाच्या मूर्तीला हार अर्पण करून राम कृष्ण हरीच्या गजरामध्ये मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.या मेळाव्यामध्ये वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विचार-विनिमय त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे विचार प्रत्येकाच्या घराघरात कशाप्रकारे पोचवता येतील या वरती चर्चा करण्यात आली.अखिल भाविक वारकरी मंडळाच्या विविध भागात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गावचे विशाल श्रीराम सपकाळ यांची उत्तर सोलापूर तालुक्याच्या सोशल मीडियाच्या तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली.व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.हा मेळावा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज व राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प भागवत चौरे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक व वारकरी मंडळी आणि संघटनेचे पदाधिकारी आले होते.विशेष म्हणजे महिला वारकरी मंडळ ही मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या.अतिथी म्हणून शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख,नगरसेवक अमोल शिंदे सह सर्व वारकरी,भाविक मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.