माण तालुक्यातील दुष्काळी भागातील विध्यार्थ्यानी रचला इतिहास ; राज्यपालांना पाडली भुरळ; थेट राजभवनावर केले आमंत्रित

37

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18ऑक्टोबर):-माण तालुका तसा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो परंतु माण तालुक्यातील पर्यती येथील जिल्हा परिषद शाळा विजयनगर येथील विध्यार्थ्यानी रचला इतिहास पर्यंती सारख्या छोट्याशा गावातील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या विध्यार्थ्याना राज्यपाल भगतसिंग कोषयारी यांनी केले थेट राजभवनावर आमंत्रित जिल्हा परिषद शाळा विजयनगर ,पर्यँती, ता.माण येथील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विध्यार्थ्यानी साबण निर्मिती, तिरंदाजी, वारली चित्रकला, पियानो वादन ,खडु बनवणे, घड्याळ निर्मिती , असे उपक्रम लिलया पार करून थेट राज्यपालांना भुरळ पाडली.

आणि पर्यंती गावाचे नाव महाराष्ट्राच्या पटलावर पोहोचवले
या सर्व विध्यार्थ्यानी ग्लोबल टीचर लोकमत महाराष्ट्रीयन शिक्षक पुरस्कार विजेते मा.श्री . बालाजी जाधव सर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या यशास गवसणी घातली.

हे सर्व विध्यार्थी रंगकामगार,मेंढपाळ,ऊस तोड मजूर,अशा अतिशय सामान्य कुटूंबातील असून घरची परिस्थती हलाखीची असताना सुद्धा या मुलांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे उपक्रम पूर्ण केले आणि राज्यपाल यांना भुरळ पाडली.राजभवनावर आमंत्रित विध्यार्थ्यामध्ये रणवीर सरतापे, सार्थक पाठक, प्रगत नरळे, प्रणव नरळे, आरोही कारंडे, प्रणाली नरळे , आदित्य काळेल,, अर्णव नरळे, संस्कार नरळे,प्रत्युष पवार हे असून यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी जाधव,ग्लोबल टीचर लोकमत महाराष्ट्रीयन पुरस्कार विजेते याचे लाभले.या सर्व विध्यार्थ्याचे सर्व सामाजिक,राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे