बहुजन समाज पार्टी श्रीरामपुर विधानसभेचे प्रशिक्षण शिबीर

15

✒️श्रीरामपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

श्रीरामपुर(दि.18ऑक्टोबर):-नुकतेच बहुजन समाज पार्टी श्रीरामपुर विधानसभेचे प्रशिक्षण शिबीर रविवार (दि.१६) रोजी लुंबिनी बुद्धविहार श्रीरामपूर येथे पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळूराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंदजी यांनी ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी मार्गदर्शन करुन काही नव्याने नियुक्त्या देण्यात आल्या. नियोजानासंदर्भात चर्चा, विचार विनिमय करण्यात आला.

यावेळी याप्रसंगी उपस्थित मान्यवर शिर्डी लोक सभा प्रभारी प्रकाश आहिरे, जिल्हा प्रभारी अण्णासाहेब धाकतोडे, उत्तर जिल्हा अध्यक्ष सुनील मगर, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, राहाता विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ बोधक, श्रीरामपुर विधानसभा महासचिव भारत त्रिभुवन, श्रीरामपुर विधानसभा अध्यक्ष जाकिरभाई शाहा, विधानसभा प्रभारी बबन बोरगे,नेवासा विधानसभा प्रभारी राजू खरात, श्रीरामपूर विधानसभा कोषाध्यक्ष सुधाकर भोसले, श्रीरामपूर शहर प्रभारी मच्छिंद्र बहिरे, श्रीरामपूर शहर अध्यक्ष आकाश शेंडे, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष सचिन शिंदे,शहर कोषाध्यक्ष नामदेव शिंदे, श्रीरामपूर शहर बामसेफ संयोजक अनिल गायकवाड, श्रीरामपूर शहर सचिव शिवाजी नरोडे, मच्छिंद्र ढोकणे, माजी कोषाध्यक्ष एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष योगेश ससाने, बेलापूर शाखा अध्यक्ष बापू भाऊ भगत, गौरव अहिरे, नर्सरी शाखा अध्यक्ष महेश गायकवाड, बबन निकाळजे, गोरख गजानन बोरकर राऊत, मंगेश कांबळे,
इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.