संघटन कौशल्याचे भांडार – अशोकराव चव्हाण साहेब

30

राजकारणातील *” मॅनेजमेंट गुरू “* अशी स्वकर्तृत्वावर महाराष्ट्रचं नव्हे तर देशाला ओळख करून देणारे नेतृत्व ,, सर्वांचे अंदाज चुकवित – भल्याभल्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरत – हाताला तेल लावलेला पहिलवान – कुणाच्याही हाताला न लागणारा – काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले ,, सत्ता असो अथवा नसो जनहिताची कामे करायची या उद्देशाने प्रेरीत झालेले , काही राजकीय हितशत्रू मंडळींचे अपमानजनक , संतापजनक वक्तव्यांचे डोस गिळुन आपल्या वक्तव्याशी आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहुन जनसेवेची कार्य करीत रहायची , जणु काही आजचे ज्योतिराव फुले , असे विकासाभिमुख नेतृत्व म्हणजेच माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब.. त्यांचाच आज वाढदिवस आहे , त्यानिमित्त त्यांना जाधव व माने परिवाराकडून ” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . ” 🌹🌹

*शुद्धबीजापोटी! फळे रसाळ गोमटी!!१!!*
मुखी अमृताची वाणी देह देहाचे कारणी!!२!!
*सर्वांग निर्मळ! चित्त जैसे गंगाजळ!!३!!*
तुका म्हणे जातो! ताप दर्शने विश्रांती!!४!!

आदरणीय श्रीमान अशोकराव शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म सुसंस्कारित कुटुंबात झाला. वडिलोपार्जित राजकीय वारसा मिळाला जन्म घेताच लोकांची सेवा करणे हे उघड्या डोळ्यांनी त्यांनी प्रकर्षाने पाहिले त्यामुळे जणू काही त्यांनी लोकसेवेचे बाळकडूच घेतलेले आहे. त्यामुळे ते काही महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत योगीच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजा सारखं त्यांचं दैयदीप्यमान व्यक्तिमत्व कर्तृत्ववान आहेत , जसे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ज्या मातीत जे बीज रुजवलं तेच रोपट तयार होणार व त्याला तीच फळे लागणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे कोणालाही लपवता येणार नाही. त्याप्रमाणे अशोकराव चव्हाण साहेब यांची कार्यप्रणाली आहे त्यांच्याबद्दल माहिती देणारा हा एक लघुलेख आहे.

….. साहेबांच्या मातोश्री स्व. कुसुमताई म्हणतात , त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण साहेब पुढे राजकारणात येतील , आमदार होतील खासदार होतील , मंत्री देखील होतील , असं कधीच त्यांना वाटलं नाही.. !! पण शाळा आणि महाविद्यालयातून त्यांनी केलेल्या नेतृत्वातूनच ते पुढे हळुहळू नकळत राजकारणाकडे आकर्षित होत गेले , असं त्यांनी ( स्व. कुसुमताई चव्हाण ) अलीकडेच लिहिलेल्या लेखातून सांगितलं..

राजकारणाकडे आकर्षित होऊन संधी जरी मिळाली असली तरी त्यांनी आपली गुणवत्ता , संघटन कौशल्य ,, पक्ष संघटनेसाठी असलेली आपली उपयुक्तता कार्यशैलीतुन सिद्ध केली , हेही खरेच आहे..

*🌴छायाम अन्यस कुर्वन्ति तिष्ठांन्ति स्वयंमातपे !*
*फलन्ति अपि परार्थाय वृक्ष: सत्पुरुषा इव!!*

वृक्ष उन्हात तळपत राहून दुसऱ्यांना छाया देतो.वृक्षास फळे येतात ती सुद्धा दुसऱ्यासाठीच असतात तशा प्रकारचं लोकपर्माधर्म जनसेवेसाठी आपले पूर्ण जीवन वाहून घेणारा नेता अशोकराव चव्हाण साहेब म्हणजे अशोकस्तंभच होय. हा *अशोकस्तंभ* डॉ. शंकरराव भाऊराव चव्हाण व कुसुमताई शंकरराव चव्हाण या उभयतांच्या पोटी 28 ऑक्टोबर 1958 ला महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या ठिकाणी मुंबादेवीच्या कर्मभूमीत व महासागराच्या किनाऱ्यावर जन्म झाला. आई-वडिलांची कर्मभूमी नांदेड , *शीख धर्माचे धर्मगुरू गुरुगोविंद सिंग* यांची पावन भूमी आणि मराठवाड्यातील मुख्यशहर नांदेड व भारतातील प्रमुख पवित्र गंगामाता गोदावरीचा किनारा लाभलेल हे नांदेड शहर या ठिकाणचा जन्मताच अशोकराव चव्हाण साहेब यांना अशा या महान संस्कृतीचा वारसा लाभला. अशोकराव चव्हाण साहेब म्हणजे एक अष्टपैलू भारदस्त व्यक्तिमत्व आहे.
अशा या व्यक्तिमत्त्वाचे शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत झाले. पूर्ववत वडिलांचा राजकीय वारसा लाभलेले स्वर्गीय डॉ शंकरराव भाऊराव चव्हाण हे भारत देशाचे उच्चपदी म्हणजेच गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी अतिशय सुजलाम सुफलाम पद्धतीने कार्य केलं.

त्यांच्या हातातून खूप मोठी *जलक्रांती* घडली. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सुखी आणि समाधानाने जीवन जगत आहेत. हा त्यांचा आशीर्वाद म्हणावा लागेल अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचे चिरंजीव अशोकराव चव्हाण साहेब यांनी काही काळ महाराष्ट्र राज्याचे वैभव म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा सन्मान त्यांना मिळाला .. ते महाराष्ट्राचे 08 डिसेंबर 2008 ते 09नोव्हेंबर 2010 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राची धुरा यशस्वी पणाने सांभाळली ते जवळपास 23 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांच्या हातातून महाराष्ट्रातील अधिकाधिक लोकांचे त्यांनी काम केले. महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केलं.

मुख्यमंत्री पदी महिने 23 स्थायिक , समर्थ लाडके नेते अशोकराव चव्हाण साहेब..
*शेती विषयी लाडका प्रश्नांची रे आगळीक.*
गोरगरिबा तारक नित्य साधे जवळीक.
*सुधारण्याचे वारे वाहे विचारा दे मोकळीक.*
कुठे दुखते खूपते लक्ष असते तव बारीक.
*धन्य संपन्न महाराष्ट्र नक्की होई उदित.*
स्वप्न पाहणारा नेता सुखात राहे नागरिक.
*लाखात एखादा नेता लाभे असा अलौकिक.*
जाने सहकार तत्व यश असावे सांघिक.
*कळते आज जनतेस विचार किती मौलिक.*

असा हा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांची नाळ जोडणारा नेता म्हणजेच अशोकराव चव्हाण साहेब..

आवडता छंद साहेबांना राजकारणच म्हणून नाही तर त्यांना विशेष वाचनाची आवड आहे. त्याचबरोबर टेबल टेनिस व गोरगरीब तरुण मुलामुलीचे सामूहिक विवाह करण्याची आणि सामान्यातील सामान्य नागरिक जरी भेटायला आला तरी त्याची काही क्षणात भेट होणार… ही एक अनमोल देणगी – पर्वणीच ते जपतात .. देशात भाजपची लाट असताना सुध्दा कित्येक मजबुत गढ उद्ध्वस्त झाले पण या लाटेत सुध्दा ते सन 2014 साली ते खासदार झाले .. इतकेच नाही तर 2014 सालि महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तारुढ झाल्यानंतर पुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अन्य निवडणुकामध्ये बहुसंख्य जिल्ह्यामध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा वरचष्मा संपुष्टात आला… पण नांदेड जिल्हा त्याला अपवाद ठरला.. हे शक्य झाले केवळ *मॅनेजमेंट गुरू अशोकराव चव्हाण साहेब* यांच्यामुळे.. या बाबीची नोंद मराठवाडा नाहीतर महाराष्ट्राने घेतली.. पुढे कोणत्याही निवडणुकीत *अशोकराव चव्हाण साहेब विरुद्ध सारे* असे चित्र साकारले गेले.. दोन मार्च 2015 मध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी भूषविले.. 2004 साली शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष झाले व त्या माध्यमातून अनेक सुशिक्षित ,, बेरोजगार ,, गरीब ,, दीनदलितांना त्यांनी आपल्या संस्थेत नोकऱ्या दिल्या.. तर 1990 मध्ये भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचे अध्यक्ष झाले व आजतागायत त्या कारखान्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम आहे.. आजच्या इतक्या स्पर्धेत सुध्दा कालची कारखान्याची निवडणूक सुध्दा बिनविरोध केली.. ही त्यांच्यावर असणाऱ्या अपार श्रद्धेची व विश्वासाची भावना जनमानसात आहे.. ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे.

नांदेड जिल्ह्यातील एक आगळ वेगळ व्यक्तिमत्त्व आहे. या व्यक्तिमत्त्वाला प्रतिस्पर्धी होण्यासाठी कैकानी प्रयत्न केले पण एकही यशस्वी होऊ शकलं नाही ,, कोणीही जवाब देऊ शकत नाही…
त्यांची धर्मपत्नी सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण ह्या भोकर तालुक्याच्या माजी आमदार आहेत ते सुद्धा समाज उपयोगी विविध क्षेत्रातील काम करतात अशोकराव चव्हाण साहेब यांच्या प्रत्येक कार्यात त्या सावली सारख्या खंबीरपणे उभ्या राहतात त्या कोणतेही काम करण्यासाठी तीळ मात्र हे डगमगत नाहीत .. आदरणीय साहेबांना दोन कन्यारत्न आहेत व श्रीजया चव्हाण ह्या अशोकराव साहेबांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि श्रीजया चव्हाण यांना खूप मोठा वारसा लाभलेला आहे. त्या नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत अस एक उमलत प्रफुल्लित तरुण व्यक्तिमत्व जनतेच्या सेवेसाठी येत आहे. नक्कीच जनता त्यांचा स्विकार केल्याशिवाय राहणार नाही हा जनतेकडून आम्ही विश्वास देऊ इच्छितो.. *( श्रिजयाताई यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. 🌹 )* … साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरा जवळ आम्ही एकच मागणी करतो की, या पुरोगामी महाराष्ट्राची धुरा परत एकदा त्यांच्या हातात यावी व हा महाराष्ट्र त्यांच्या सत्कार्यातून सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ही एकच मागणी आमची आहे.

*झाले बहु होतील बहु परी या सम हाच म्हणजेच…… अशोकराव चव्हाण साहेबंच…*

सन 2022 म्हणजे भारताचे अमृत महोत्सवी वर्ष व हा ऑक्टोबर महिना म्हणजे जिकडे तिकडे दीपावली महोत्सव तुम्ही- आम्ही साजरा करीत आहोत व या वाढदिवसानिमित्त साहेबांना लाख लाख शुभेच्छा…!

स्नेहाचा सुगंध दरवळला.
आनंदाचा क्षण आला.
विनंती आमची परमेश्वराला.
सौख्य समृद्धी आरोग्य लाभो तुम्हाला.

*🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🌹*

*तुम जिओ हजारो साल,साल के दिन हो पचास हजार*

*🌹-: शुभेच्छुक :-🌹*
*———————————*
✒️श्री संतोष पुंडलिकराव जाधव(मु. मनुला(बु.),ता.हदगावमो:-9657328510

▪️श्री.दिगंबर चंपतराव माने(शिक्षक)व्यंकटेश नगर उमरखेड. यवतमाळ(मो:-9404412886)