पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे भव्य कुस्त्याची दंगल

61

🔹वार्डातील दंगलीची परंपरा कायम:युवकात आनंदाचे वातावरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28ऑक्टोबर):-दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर श्री. गुरुदेव सेवा मंडळ व जय बजरंग व्यायाम मंडळ पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे भव्य कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जी प सदस्य चंद्रपूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिपक भाऊ उराडे ,उपाध्यक्ष म्हणून तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके,प्रमुख अतिथी नियोजन सभापती तथा नगरसेवक महेश भर्रे,अनंता उरकुडे, विनोद झोडगे, अविनाश राऊत, पत्रकार गोवर्धन दोनाडकर,प्राचार्य डी. के .मेश्राम,माजी नगरसेवक बंटीभाऊ श्रीवास्तव,विनोद दिवटे,धोंगडे साहेब, संदीप राऊत,डाकराम ठाकरे, सोमेश्वर उपासे,शत्रुघ्न भर्रे,आदी मान्यवर उपस्थित होते. सन1965 वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पेठ वार्ड येथे भेट दिली .त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली.

गुरुदेव सेवा मंडळाच्या स्थापनेपासून आस्थागायत त्यांच्या दंगलीचे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येते हे आयोजन करीत असताना मंडळाचे प्रेरणास्थान स्वर्गीय विठ्ठलराव राऊत , स्व. प्रा.किशोर हजारे यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवून दगलीची परंपरा कायम ठेवली पुढील काळात प्राचार्य गंगाधरजी पिलारे दिगंबरजी कुथे, सोमेश्वरजी उपासे आदी मंडळींनी मोठ्या उत्साहाने दगलीचा सोहळा साजरा करीत आले. त्यानंतर त्या काळात जय बजरंग व्यायाम मंडळ यांची धुरा युवक नेतृत्वाकडे आली त्यात त्यात प्रकाश कुथे, ओमसागर उरकुडे , लोकेशजी भरदे , सुभाषजी उपाशी इत्यादी युवक मंडळींनी या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कठीण परिश्रम घेतले आणि आता त्यांच्याही पुढे जाऊन पेठवार्ड येथील तिसरी पिढी यात कुणाल भगत, प्रदीप उरकुडे ,परिमल उरकुडे ,विशाल राऊत ,विकास ठाकरे इत्यादी मंडळी दीपावलीच्या दिवशी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करत पेटवाड येथील 57 वर्षापासून चालू असलेली परंपरा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण मल्लांचा योग्य सन्मान करून यशस्वीरित्या पार पाडत असतात असे मत प्रस्ताविक मध्ये संदीप राऊत यांनी व्यक्त केले.भव्य कुस्त्यांच्या दंगलीत तीन-चार जिल्ह्यातील कुस्तीगार उपस्थित होते. मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक भास्कर उरकुडे तर नगरसेवक तथा नियोजन सभापती महेश भर्रे यांनी केले.