धामक येथे कार्तिक पौर्णिमा निमित्त महाशिवपुराण व किर्तन सोहळाचे आयोजन

59

🔸श्री संत गजानन महाराज वर्धापन दिनाच्या निमित्त

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.31ऑक्टोबर):-धामक येथे कार्तिक महिन्यात सकाळी काकड आरती सुरु होती सांगता दिवशी श्री संत गजानन महाराज संस्थान येथे संत गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त शिवमहापुराण आयोजन करण्यात आले आहेत कथा व्यासपीठ आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या वाणीतुन दुपारी 1 ते 5 पर्यत राहिल.

महाराष्ट्रतील नामवंत किर्तन होईल या दि 1 नोव्हेंबर ह भ प रमेश महाराज दुधे दारव्हा यवतमाळ दि 2 नोव्हेंबर ह भ प पुरुषोत्तम पाटील बुलढाणा 3 नोव्हेंबर ह भ प हरीओम महाराज शास्त्री आळंदीकर 4 नोव्हेंबर ह भ प विलास महाराज गेजगे परभणी 5 नोव्हेंबर ह भ प विलास महाराज खोले श्रीक्षेत्र मुक्ताईनगर 6 नोव्हेंबर ह भ प कु शितलताई साबळे राहुरीकर 7 नोव्हेंबर ह भ प अरुण महाराज लांडे पारस शेगाव श्री ची धामक येथे पालखी ची नगरप्रदिक्षणा दुपारी 3 ते 6 श्री गजानन महाराज दिंडी मंडळ बेबळा हे राहतील.

दि 8 काल्याचे किर्तन स्वामी गजेंद्र चैतन्य जी महाराज यांचे राहील त्यानंतर महाप्रसाद सुरुवात होणार .सहभाग श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भजन मंडळ श्री संत ज्ञानेश्वर महाराज महिला मंडळ सर्व ग्रामवाशी यांचे सहकार्य राहील अशी माहिती श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीनै देण्यात आली .